भाजप युवा मोर्चाची मुख्यमंत्र्यांना पाच हजार पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:31 IST2021-09-07T04:31:48+5:302021-09-07T04:31:48+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क दुधोंडी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्ट रोजी आपल्या सहकारी अधिकाऱ्यास रौप्यमहोत्सवी की अमृतमहोत्सवी ...

Five thousand letters of BJP Yuva Morcha to the Chief Minister | भाजप युवा मोर्चाची मुख्यमंत्र्यांना पाच हजार पत्रे

भाजप युवा मोर्चाची मुख्यमंत्र्यांना पाच हजार पत्रे

लाेकमत न्यूज नेटवर्क

दुधोंडी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्ट रोजी आपल्या सहकारी अधिकाऱ्यास रौप्यमहोत्सवी की अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन असल्याचे विचारून तमाम देशवासीयांची मने दुखावली. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत भाजप युवा मोर्चातर्फे ठाकरे यांना पाच हजार पत्रे पाठवल्याचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, या पत्राच्या प्रती राज्यातील सर्व खासदार व आमदार, इतर लोकप्रतिनिधींना पाठवून निषेध व्यक्त केला आहे. सांगली जिल्हा भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील यांना या पत्राची प्रत देण्यात आली. यावेळी भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेंद्र चौगुले, मकरंद देशपांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Five thousand letters of BJP Yuva Morcha to the Chief Minister