शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अग्रण धुळगावच्या खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेप, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:31 IST

यात्रेत तमाशा कार्यक्रमात दंगा केल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपींनी हत्यारे, काठ्या घेऊन भोसले बंधूंवर हल्ला चढविला होता

सांगली : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील अशोक तानाजी भोसले (वय २३) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी हा निकाल दिला.संदीप दादासाे चाैगुले (वय २६), विशाल बिरुदेव चौगुले (वय २३), नानासो उर्फ सागर माणिक चौगुले (वय २५), कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनप (वय २५), विजय आप्पासाे चौगुले (वय २३, सर्व रा. अग्रण धुळगाव) अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आराेपींची नावे आहेत.

त्यांना जन्मठेपेसह दीड हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावास, कलम १४३ अन्वये तीन महिने सश्रम कारावास, १४७ अन्वये १ वर्ष तर कलम १४८ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा एकत्रित भोगायची आहे. खून प्रकरणातील सागर बाळासो चौगुले हा आरोपी मयत झाला आहे. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.ही घटना २ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. यात्रेनिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमात दंगा केल्याने मृत अशोक व त्याचा भाऊ प्रकाश यांनी पंच कमिटीकडे तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी कुकरी, गुप्तीसारखी हत्यारे, काठ्या घेऊन भोसले बंधूंवर हल्ला चढविला.यात अशोक गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला हत्याराने भोसकून काठ्यांनी मारहाण केली होती. उपचारापूर्वी तो मृत झाला होता. त्याचा भाऊ प्रकाशही या घटनेत जखमी झाला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून प्रकाश भोसले, तिऱ्हाईत साक्षीदार ज्ञानेश्वर भोसले तसेच फिर्यादी असलेले त्यांचे वडील तानाजी संभाजी भोसले यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.

या निकालाचा दाखला महत्त्वपूर्णया प्रकरणात जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सर्वोच्च न्यायालयातील ‘नित्यानंद विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार’ या प्रकरणातील निकालाचा दाखला दिला. सहआरोपी मुख्य आरोपींइतकेच जबाबदार असतात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा दाखला महत्त्वपूर्ण ठरला. त्यानुसार पाचही आरोपींना जन्मठेपेची मागणी करण्यात आली होती.

या पोलिसांची मदत कामीस्थानिक गुन्हे अन्वेषणचे तात्कालीन पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी राजन माने, कवठेमहंकाळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्यासह पैरवी कक्षातील अशोक तुराई, वंदना मिसाळ, कवठेमहंकाळ ठाण्याचे वैभव काळे, शहाजी जाधव व अन्य पोलिसांची मदत व काम या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस