झरे येथे पाच लाखाची घरफाेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST2020-12-26T04:22:47+5:302020-12-26T04:22:47+5:30

प्रशांत बापूसाहेब स्वामी हे २२ डिसेंबर रोजी भाचीचे लग्न असल्याने कुटुंबीयांसह घर बंद करून घरास कुलूप लावून परगावी गेले ...

Five lakh burglary at Jhare | झरे येथे पाच लाखाची घरफाेडी

झरे येथे पाच लाखाची घरफाेडी

प्रशांत बापूसाहेब स्वामी हे २२ डिसेंबर रोजी भाचीचे लग्न असल्याने कुटुंबीयांसह घर बंद करून घरास कुलूप लावून परगावी गेले होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी केली. कपाटात असलेल्या ड्राॅव्हरमधील १ लाख ९५ हजार रुपये व अडीच तोळ्याची सोन्याची साखळी, एक तोळ्याची अंगठी, साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, १४ ग्रॅम वजनाच्या चार जोड सोन्याच्या रिंगा, तीन ग्रॅम वजनाची अंगठी आणि चांदीची भांडी, त्यामध्ये दोन वाट्या, चार निरांजन, दोन कुंकवाचे करंडे, दोन जोडवी आणि दोन पैंजण असे साेन्या-चांदीचे दागिने असा एकूण सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज चाेरट्यांनी लंपास केला.

याबाबत प्रशांत स्वामी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक एम. एस. देवकर करीत आहेत.

Web Title: Five lakh burglary at Jhare