शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मद्यपी ट्रकचालकाच्या धडकेत पाच जखमी, लोकांनी ट्रकचालकास केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:45 IST

रेठरे धरण : कोल्हापूरहून कराडच्या दिशेने निघालेल्या ट्रक (क्रमांक केए २२ डी १६९८) चालकाने दारूच्या नशेत ट्रक चालवीत मालवाहू ...

रेठरे धरण : कोल्हापूरहून कराडच्या दिशेने निघालेल्या ट्रक (क्रमांक केए २२ डी १६९८) चालकाने दारूच्या नशेत ट्रक चालवीत मालवाहू मोटार, दुचाकीस्वार व चायनीज गाड्यांना धडक देऊन चार ते पाच लोकांना उडविले. यामध्ये ट्रकचालकासहित पाच जण जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, सदर मालवाहू मोकळा ट्रक वाघवाडीकडून पेठ येथील सेवा रस्त्यावर वेगात आला. तेव्हा ट्रकच्यापुढे इंजिन पार्ट घेऊन निघालेल्या मोटारीला ट्रकने जोरात धडक दिली व तो तसाच वेगात फुटपाथवर उड्डाणपुलाच्या भिंतीला घासत गेला. फुटपाथवर असणाऱ्या चायनीज गाड्यांना त्याने दाबत नेले. तेव्हा तेथे असणारे मुबारक जमादार (वय ४८) व नोमान जमादार (२०) या अपघातात जखमी झाले. तसेच मोटारीला धडक देण्यापूर्वी ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये ईश्वर बाळासो नायकल (वय ३३) व त्यांच्या पत्नी सोनाल ईश्वर नायकल (वय ३०) हे पती व पत्नी नाल्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक इम्तियाज मुजावर (वय ५०, रा. बेळगाव) यांच्या तोंडास तसेच पोटाला मार लागला आहे. दारू पिऊन नशेत गाडी चालविल्याने मोठा अपघात झाला.यावेळी जमलेल्या लोकांनी ट्रकचालकास बेदम मारहाण केली. श्री कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून धनराज तापोळे, मनोज पाटील यांनी जखमींना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात