आटपाडीतील रोगनिदान शिबिरात पाचशेजणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST2021-02-20T05:16:27+5:302021-02-20T05:16:27+5:30
करगणी : आटपाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व रोगनिदान शिबिर झाले. पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. पालकमंत्री ...

आटपाडीतील रोगनिदान शिबिरात पाचशेजणांची तपासणी
करगणी : आटपाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व रोगनिदान शिबिर झाले. पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आटपाडी तालुका महिला राष्ट्रवादी व सिनर्जी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तहसीलदार सचिन शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार, आनंदराव पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रा. नारायण खरजे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. अनिता पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर विशेष भर देत तपासणी करण्यात आली.
तालुका उपाध्यक्ष दत्ता यमगर, किशोर गायकवाड, सौ. मंजुश्री पाटील, सौ. अश्विनी कासार, तालुकाध्यक्ष सौ. आशा देशमुख, हणमंत चव्हाण, चंदन खंदारे, नीता येवळे, पूजा गुरव उपस्थित होते.