शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वैभव, रोहित पाटील, सुहास बाबर पहिल्याच चेंडूवर षटकारासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 18:29 IST

घनशाम नवाथे सांगली : क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणे सहज शक्य नसते. त्यासाठी ‘सेट’ व्हावे लागते. परंतु राजकारणात तसे ...

घनशाम नवाथेसांगली : क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणे सहज शक्य नसते. त्यासाठी ‘सेट’ व्हावे लागते. परंतु राजकारणात तसे काही नसते. पहिल्याच प्रयत्नात विजयी षटकार ठोकण्याची संधी चालून येऊ शकते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युवा नेते रोहित पाटील, सुहास बाबर, वैभव पाटील, संग्रामसिंह देशमुख, जयश्री पाटील यांची पहिली लढत उत्कंठावर्धक आणि चर्चेची ठरू शकते. पहिल्याच प्रयत्नात ते षटकार ठोकणार? की झुंज देणार? हे प्रचाराची रणनीती, पाठीराख्यांची ताकद, लढतीपूर्वीचा सराव आदींवर अवलंबून असणार आहे.

पूर्वीचा तासगाव मतदारसंघ आणि आत्ताचा तासगाव-कवठेमहांकाळ येथील लढतीकडे अनेकांचे लक्ष असते. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यानंतर सुमनताई पाटील यांनी हा गड राखला. आता नवे शिलेदार म्हणून रोहित पाटील मैदानात उतरले आहेत. त्यांची पहिली लढत तीदेखील विधानसभेची आहे. त्यांच्या वडिलांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, माजी खा. संजय पाटील यांच्याशी त्यांचा सामना असेल. राज्याचे युवा नेते म्हणून ते सर्वत्र चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.खानापूर मतदारसंघात दिवंगत नेते आ. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना शिंदेसेनेकडून अपेक्षेप्रमाणे उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात महाआघाडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दोघेही विधानसभेच्या मैदानात प्रथमच लढत आहेत. दोन्ही कुटुंबांची पारंपरिक लढाई यापूर्वी लक्षवेधी ठरली आहे. आता दोन्ही कुटुंबांचे वारस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पहिल्याच प्रयत्नात विजयाचा षटकार ठोकण्यासाठी ते सज्ज आहेत. अर्थात त्यांची लढाई सोपी नसून त्यांना फार सराव करावा लागणार आहे.

पलूस-कडेगाव मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मागील निवडणुकीत त्यांना तिकीट मिळाले नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीत लढायचे असा निर्धार करून ते सज्ज आहेत. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आ. डॉ. विश्वजीत कदम मैदानात उतरले आहेत.सांगलीत विधानसभेच्या मैदानात जयश्री पाटील या प्रथमच उतरल्या आहेत. तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यांच्यामागे मदनभाऊंचे समर्थक आहेत. प्रमुख लढतीमध्ये असलेल्या रोहित पाटील, सुहास बाबर, वैभव पाटील, संग्रामसिंह देशमुख, जयश्री पाटील हे प्रथमच विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. यापूर्वी पहिल्याच प्रयत्नात विधानसभेला विजयाचा षटकार अनेकांनी ठोकला आहे. त्यांच्या यादीत आणखी कोणाचा समावेश होणार? याची उत्सुकता अनेकांना असणार आहे.

काही पुन्हा नशीब आजमावणारविधानसभेच्या मैदानात सलग दुसऱ्यांदा, हॅटट्रिक किंवा त्यापेक्षा जास्तवेळा निवडून येण्यासाठी काही उमेदवार रिंगणात आहेत. काहींचा पराभव झाल्यानंतर ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. पराभवाचा वचपा काढण्याची काहींना प्रतीक्षा असणार आहे. त्याचबरोबर पाडापाडीच्या राजकारणासाठीही काहीजण सज्ज आहेत. त्यामुळे कोणाचे नशीब साथ देणार? याचीही उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीkhanapur-acखानापूरtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळRohit Patilरोहित पाटिलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024