शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगलीतील कृष्णा नदी काठावर परदेशी पक्ष्यांचा किलबिलाट, आमणापुरात 'करकरा क्रोंच' पक्ष्याचे प्रथमच दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 15:18 IST

मीटरभर उंचीचा करकरा क्रोंच हा पक्षी पाकिस्तान, चीन, तिबेटसह मंगोलियामधून एव्हरेस्ट पार करून येतो.

शरद जाधवभिलवडी : पलूस तालुक्यातील आमणापूर परिसरातील कृष्णाकाठी प्राणी व पक्षी जीवन बहरत आहे. यंदाच्या हिवाळ्यात रुबाबदार अशा परदेशी पाहुण्या पक्षाच्या दोन जोड्या लक्षवेधक ठरल्या आहेत. सांगली जिल्ह्यात प्रथमच करकरा क्रोंच पक्ष्याची गेल्या दोन दिवसांत नोंद झाली आहे. आमणापूर येथील पक्षिप्रेमी संदीप नाझरे यांनी याबाबत संशोधन करून ही माहिती दिली.पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील कोंडार परिसरात सध्या पक्ष्यांची शाळा भरली आहे. उथळ पाण्यावरील पहाटेच्या धुक्याची झालर बाजूला होताच पक्ष्यांचा किलबिलाट काठावरची नीरव शांतता भंग करत आहे. या कोंडार परिसरात स्थानिक पक्ष्यांबरोबर देश-विदेशांतील पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे.

नव्या पाहुण्याची गोष्ट भारी

  • मीटरभर उंचीचा करकरा क्रोंच हा पक्षी पाकिस्तान, चीन, तिबेटसह मंगोलियामधून एव्हरेस्ट पार करून येतो.
  • राजस्थान, गुजरातमध्ये या पक्ष्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात पहायला मिळते.
  • करकरा क्रोंचला कांड्या करकोचा, असेही म्हणतात.
  • करड्या रंगाच्या असलेल्या पक्ष्याच्या डोक्यावर करडा पट्टा असतो. सुरेख पांढरी भुवई आणि गळ्यावर काळ्या रंगाचा मफलरप्रमाणे पट्टा असतो. कर्कश आवाज करणाऱ्या आणि थव्यांनी वास्तव्य करणाऱ्या या पक्ष्यांचा वावर कृष्णाकाठावर पहायला मिळत आहे.

हेसुद्धा पाहुणेआले भेटीला

क्रोंचबरोबरच या ठिकाणी ब्राऊन हेडेड गुल, छोटा कंठेरी चिखल्या, ठिपकेदार तुतवार, पांढरा धोबी, पिवळा धोंबी, करडा धोबी असे पाहुणे पक्षी तसेच खुल्या चोचीचा करकोचा, ब्लॅक आयबीस, कुदळ्या, ढोकरी बगळा, नदी सुरय, हळदी कुंकू बदक, राखी बगळा, टिटवी, धीवर, भिंगरी, पानकावळा, शेकोट्या आदी पाणथळीच्या पक्षांनी कृष्णाकाठावर गर्दी केली आहे. यावर्षी दीर्घकाळ पाऊस पडल्याने दलदलीच्या जागा वाढल्याने पक्षी विखुरल्याचे पहायला मिळत आहे.

गतवर्षी भुवई बदक, छोटा आर्ली हे नवीन पाहुणे पहायला मिळाले होते. पोषा, बांडी, करकरा, कार्कुंगा, कुंज अशीपोषा, बांडी, करकरा, कार्कुंगा, कुंज अशी डेमोजाईल क्रेन याची ठिक ठिकाणी प्रचलित नावे आहेत. ज्वारी व करडई हे त्यांचे आवडते खाद्य असल्याने सोलापूर जिल्ह्यात त्यांचे येणे-जाणे असते. - अभ्यासक डॉ. निनाद शहा, सोलापूर

टॅग्स :Sangliसांगली