First elections to be held in Sangli assembly constituency on September 22 | सांगली विधानसभा मतदारसंघात 22 सप्टेंबरला पहिली चुनाव पाठशाला

सांगली विधानसभा मतदारसंघात 22 सप्टेंबरला पहिली चुनाव पाठशाला

सांगली : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान जनजागृती करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी चुनाव पाठशालाचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत.

सांगली विधानसभा मतदारसंघात सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी चुनाव पाठशालांचे रविवार, दिनांक 22 सप्टेंबर, दुसरी चुनाव पाठशाला बुधवार, दिनांक 2 ऑक्टोबर व तिसरी चुनाव पाठशाला रविवार, दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजन करावे, अशा सूचना मतदान नोंदणी अधिकारी, सांगली विधानसभा मतदारसंघा तथा निवडणूक निर्णय अधिकारी-सांगली वसुंधरा बारवे यांनी दिल्या आहेत.

सर्व बीएलओनी केंद्रांमध्ये सर्व नवमतदार, दिव्यांग मतदार, सीनियर सिटीजन, निवृत्त शासकीय कर्मचारी/अधिकारी, 14 ते 17 वयोगटातील सर्व तरुण, 14 वर्षापर्यंतची मुले जी शाळेला जात नाहीत, आणि सर्व महिला या सर्वांना या चुनाव पाठशाला साठी आमंत्रित करावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी शाळेतील मुलांमार्फत सर्व पालकांना चुनाव पाठशाला करिता उपस्थित राहण्याबाबत आमंत्रित करावे, असेही त्यांनी सूचित केले आहे.

चुनाव पाठशाळेत मतदार याद्यांचे सर्वासमोर वाचन करण्यात यावे, व मतदान प्रक्रिया बाबत माहिती देऊन शंकासमाधान करावे. तरुण मुलांना जे नवमतदार आहेत त्यांना मतदान करणे बाबत प्रेरित करण्यात यावे. मतदारांना ऑनलाइन मतदार यादीत स्वतःचे नाव शोधण्यासाठी ceo.maharashtra.gov.in पपोर्टल वर तसेच ऑनलाइन या वेबसाईटवर जाऊन शोधणे बाबत मार्गदर्शन करावे.

नवीन मतदारांना मतदार यादी मध्ये नाव नोंदविण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत नाव कसे नोंदवायचे याबाबत मार्गदर्शन करावे. सर्व केंद्रस्तरीय अधिकारी यांनी चुनाव पाठशालेच्या दिवशी मतदान केंद्रावर थांबावे.ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे व आपल्या परिसरातील लोकांनीही मतदान करण्यास प्रोत्साहित करावे याबाबत सर्वांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
 

Web Title: First elections to be held in Sangli assembly constituency on September 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.