शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सांगलीवाडीत पुठ्ठा गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान, दोन तासानंतर आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:40 PM

सांगलीवाडीतील शिवकुमार केवट यांच्या पुठ्ठा व प्लॅस्टिकच्या गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत जुना पुठ्ठा व प्लॅस्टिकचे साहित्य जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

ठळक मुद्देसांगलीवाडीत पुठ्ठा गोदामाला भीषण आगलाखोंचे नुकसान, दोन तासानंतर आग आटोक्यात

सांगली : सांगलीवाडीतील शिवकुमार केवट यांच्या पुठ्ठा व प्लॅस्टिकच्या गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत जुना पुठ्ठा व प्लॅस्टिकचे साहित्य जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

उत्तरप्रदेश येथील शिवकुमार केवट आणि त्यांचे बंधू रामअवतार केवट यांचे सांगलीवाडी येथे पुठ्ठा आणि प्लॅस्टिकचे गोडावून आहे. सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या गोदामातून धुराचे लोट येत असल्याचे शेजाऱ्यांना लक्षात आले. त्यानंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते.

शिवकुमार यांच्या गोदामातील लोखंडी अ‍ॅगल, पत्रे वितळले होते. गोदामाशेजारी मधुकर हसबे यांच्या घरालाही आगीची झळ लागली. त्यांच्या घरावरील पाण्याची टाकी जळून खाक झाली. पाण्याच्या कनेक्शनच्या पाईपही जळून खाक झाल्या. खिडकीच्या काचाही फुटल्या.रामअवतार यांच्या तळमजल्यावरील प्लॅस्टिकच्या गोदामातही आग पसरली. प्लॅस्टिकचे सर्व साहित्य जळाले आहे. रामअवतार दुसऱ्या मजल्यावर राहतात. तिथेपर्यंत आग पसरली गेल्याने भिंती काळवंडल्या आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या सहा गाड्या लागल्या.

दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय आहे. शहर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. नुकसानीचा आकडा स्पष्ट झालेला नाही. पण लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शिवकुमार व रामअवतार केवट यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीfireआग