कोरोना रुग्णांचे संपर्क तातडीने शोधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST2021-05-05T04:42:43+5:302021-05-05T04:42:43+5:30

सुरू करावेत, असे आदेश तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी सोमवारी दिले. तसेच रुग्णांचे संपर्क तातडीने शोधून आवश्यकतेनुसार चाचण्या करा. ...

Find contact with Corona patients immediately | कोरोना रुग्णांचे संपर्क तातडीने शोधा

कोरोना रुग्णांचे संपर्क तातडीने शोधा

सुरू करावेत, असे आदेश तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी सोमवारी दिले. तसेच रुग्णांचे संपर्क तातडीने शोधून आवश्यकतेनुसार चाचण्या करा. अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

बुधगाव (ता. मिरज) येथे सध्या ५८ सक्रिय रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेत आजअखेरची रुग्णसंख्या १२१ आहे. दोन आठवड्यांपूर्वी तहसीलदार कुंभार यांनी उपायोजना राबविण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी सोमवारी ग्रामपंचायतीत येऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.

ते म्हणाले, सुरुवातीला रुग्ण स्थानिक पातळीवरच गावातील खासगी डाॅक्टरांकडेच उपचार घेण्यास प्राधान्य देतात. परिस्थिती बिकट झाल्यानंतर धावपळ करतात. यामध्ये वेळ गेल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक डाॅक्टरांनी रुग्णांसंबंधीची माहिती आरोग्य विभागाला दररोज द्यावी. त्यातून सतर्कता वाढण्यास मदत होते. गृहविलगीकरणात राहणारे एकतर निर्बंध पाळत नाहीत. अशावेळी भीती वाढते. हे सर्व टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने त्वरित विलगीकरण कक्ष सुरू करावेत.

यावेळी सरपंच सुरेश ओंकारे, शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील, डाॅ. वसिम चौगुले, वैद्यकीय अधिकारी डाॅ. मंदाकिनी नागरगोजे, ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे, बजरंग भगत, श्रीनिवास पाटील, नंदू गोसावी आदी उपस्थित होते.

चौकट

तर कारवाई होईल...

बुधगावात डाॅ., वसिम चौगुले यांनी ७ ऑक्सिजन बेडचे सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील व रफिक हवालदार यांनी अडथळा आणल्याची तक्रार यावेळी तहसीलदारांकडे करण्यात आली. तुम्ही सेंटरचे काम सुरू ठेवा. यापुढे विरोध झाल्यास, अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द तर होईलच प्रसंगी तुरुंगातही जावे लागेल, असा इशारा तहसीलदार कुंभार यांनी दिला.

Web Title: Find contact with Corona patients immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.