अण्णासाहेब गोडबोले यांच्यामुळे सामान्यांना आर्थिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST2020-12-12T04:43:07+5:302020-12-12T04:43:07+5:30
शिराळा : अण्णासाहेब गोडबोले यांनी सांगली अर्बन बँकेची स्थापना करून सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले, असे ...

अण्णासाहेब गोडबोले यांच्यामुळे सामान्यांना आर्थिक आधार
शिराळा : अण्णासाहेब गोडबोले यांनी सांगली अर्बन बँकेची स्थापना करून सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले, असे प्रतिपादन सांगली अर्बन बँकेच्या शिराळा शाखेचे सल्लागार अध्यक्ष सुमंत महाजन यांनी शिराळा येथे केले.
अण्णासाहेब गोडबोले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शाखाधिकारी सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुमंत महाजन यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले.
सुमंत महाजन म्हणाले, ज्यावेळी गरीब, उपेक्षित लोकांना आर्थिक मदतीची गरज होती, त्यावेळी गोडबोले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सांगली अर्बन को-ऑप. बँकेची स्थापना केली. अनेक अडचणींवर मात करून ही बँक नावारूपाला आणली आहे. त्यामुळे ही बँक सर्वांना आपली वाटते. या बँकेने अनेक मापदंड निर्माण केले असून सहकार क्षेत्रात गोडबोले यांचा आदर्श पुढे ठेवून कार्य सुरू ठेवले आहे.
यावेळी अरविंद काळे, सुरेश माने, सचिन जोशी, राजू कुंभार, स्वानंद महाजन उपस्थित होते. माणिक पाटील यांनी आभार मानले.
फोटो-11shirala03
फोटो ओळी :
शिराळा येथील सांगली अर्बन बँकेच्या शाखेत अण्णासाहेब गोडबोले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सुमंत महाजन, सुभाष पाटील, माणिक पाटील, अरविंद काळे, सचिन दोशी, सुरेश माने उपस्थित होते.