शहिद जवानांच्या कुटूंबियांना ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:11 IST2019-06-11T17:10:12+5:302019-06-11T17:11:25+5:30

जम्मू-काश्मिर मधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबियाकरीता 47 हजार 700 रुपए आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) प्रादेशिक विभाग कोल्हापूर यांच्यातर्फे महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर माने व सचिव अंजुमन रशिद खान यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

Financial Assistance for Veterans of Shahid Jawans | शहिद जवानांच्या कुटूंबियांना ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे आर्थिक मदत

शहिद जवानांच्या कुटूंबियांना ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे आर्थिक मदत

ठळक मुद्देशहिद जवानांच्या कुटूंबियांना ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे आर्थिक मदतएकूण 47 हजार 700 रुपए मदतीचा धनादेश

सांगली : जम्मू-काश्मिर मधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या
कुटूंबियाकरीता 47 हजार 700 रुपए आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) प्रादेशिक विभाग कोल्हापूर यांच्यातर्फे महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर माने व सचिव अंजुमन रशिद खान यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबियाकरीता आर्थिक मदतीबाबत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघाना प्रादेशि‍क विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या आवाहानास प्रतिसाद देत लिंगनूर, सोनी,
सुभाषनगर, मिरज, शिराळा येथील ज्येष्ठ नागरिक संघासह जिल्ह्यातील इतर ज्येष्ठ नागरिक संघाकडून प्रादेशिक विभागाकडे प्राप्त मदतीतून एकूण 47 हजार 700 रुपए मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे काशिनाथ काळे, आनंदराव अमृतसागर, प्रल्हाद महाजन, जगन्नाथ मोरे, बाळासाहेब शिरोटे, सुधीर नाईक, चेलनादेवी खुरपे, मुश्ताक शेख आदि उपस्थित होते.

Web Title: Financial Assistance for Veterans of Shahid Jawans