शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील मालिका आणि चित्रपटांची चित्रिकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 17:19 IST

CoronaVirus cinema Sangli : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रिकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरीत झाली आहेत. चित्रिकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.

ठळक मुद्देसांगलीतील मालिका आणि चित्रपटांची चित्रिकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरीतसांगली चित्रिकरणासाठी आवडती डेस्टीनेशन्स

संतोष भिसे सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रिकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरीत झाली आहेत. चित्रिकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मालिका आणि चित्रपटांची चित्रिकरणे मोठ्या प्रमाणात सुरु झाली होती. विशेषत: मराठी वाहिन्यांवरील मालिका व लो बजेट चित्रपटांची चित्रिकरणे सातत्याने कोठे ना कोठे सुरु असायची.कोरोनाच्या पहिल्या लाटेत निर्बंधांचे पालन करत छायाचित्रण सुरु राहिले होते. दुसऱ्या लाटेत निर्बंध कडक झाल्यानंतर निर्मात्यांनी गाशा गुंडाळला. गोवा, सिल्वासा, दीव, दमण आदी ठिकाणी स्थलांतर केले. तेथे निर्बंध शिथील असल्याने तसेच निसर्गसौंदर्याची स्थळे भरपूर असल्याने चित्रिकरण सोयीचे ठरले.सांगलीत चित्रिकरणे थांबल्याने त्यातील रोजगारही थांबला. हॉटेल्स व लॉजमधील कलाकारांचे मुक्काम थांबले. सांगली-मिरजेत केटरिंग व्यावसायिकांकडून कलाकारांना जेवण पुरवले जायचे. त्याशिवाय कलाकारांची ने-आण करणारी वाहतूक, मालिकेत सहकलाकार म्हणून मानधनावर मिळणारी संधी, चित्रिकरणासाठी इमारत मालकांना मिळणारे भाडे अशी मोठी उलाढाल व्हायची. हे सारे अर्थचक्र आता थंडावले आहे.चित्रिकरणासाठी आवडती डेस्टीनेशन्सकृष्णा आणि वारणा नद्यांचा परिसर, विविध गावांतील ऐतिहासिक वाडे, देखणे फार्म हाऊस, दंडोबाच्या डोंगररांगा, वाळवा तालुक्यात लांबच लांब पसरलेली फुलशेती ही काही डेस्टीनेशन्स निर्मात्यांना आकर्षित करायची. मिरजेतील कृष्णाघाटावर मालिका व गाण्यांच्या अल्बमची छायाचित्रणे अखंडपणे व्हायची. मिरजेचे भूतपूर्व संस्थानिक पटवर्धन सरकारांच्या बेडग रस्त्यावरील देवी भवनमध्ये तर सुमारे वर्षभरापासून अखंडपणे एका मराठी मालिकेचे छायाचित्रण सुरु होते. वाळवा तालुक्यातील रामलिंग बहे, अ‍ौदूंबर येथील दत्त देवस्थान, अंकली गावातील ऐतिहासिक वाडे, कवठेएकंद येथील सिद्धनाथ मंदिर, सांगलीत मिशन कंपाऊंड, आयर्विन पूल, मालगावचा बावाफन दर्गा ही काही चित्रिकरण स्थळे निर्मात्यांच्या आवडीची ठरली होती. 

टॅग्स :cinemaसिनेमाbollywoodबॉलिवूडTelevisionटेलिव्हिजनSangliसांगली