आत्महत्या थांबविण्यासाठी रिक्त पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:05+5:302021-07-07T04:32:05+5:30
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर शासनाने तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी ...

आत्महत्या थांबविण्यासाठी रिक्त पदे भरा
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर शासनाने तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनतर्फे करण्यात आली आहे.
संघटनेचे प्रमुख अमोल वेटम यांनी पत्रकात म्हटले आहे की, स्पर्धा परीक्षांच्या युगात विविध क्लासेसची लागलेली चढाओढ, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, वाढती बेरोजगारी, खासगीकरण, कमी होणाऱ्या नोकऱ्या, स्पर्धा परीक्षा व नोकरीतील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप, कुटुंबाचे कर्ज, शैक्षणिक कर्ज, गरीब परिस्थिती, वाढती वयोमर्यादा व परीक्षेसाठी मर्यादित संधी, रखडलेल्या विविध सरकारी तसेच स्पर्धा परीक्षांचे निकाल यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक, शारीरिक, आर्थिक दडपण येत आहे. यातून प्रसंगी ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. महाआघाडी सरकारने तत्काळ रिक्त जागा भरण्याबाबत निर्णय घ्यावा.