धामणीत एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:28 IST2021-04-28T04:28:36+5:302021-04-28T04:28:36+5:30

सांगलीत घरात घुसून तोडफोड सांगली : शहरातील आकाशवाणी परिसरात सात अनोळखी लोकांनी घराचे प्रवेशद्वार, लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश ...

Filed a case against one in Dhamni | धामणीत एकावर गुन्हा दाखल

धामणीत एकावर गुन्हा दाखल

सांगलीत घरात घुसून तोडफोड

सांगली : शहरातील आकाशवाणी परिसरात सात अनोळखी लोकांनी घराचे प्रवेशद्वार, लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश करून एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषोत्तम सीतलाम लालवाणी (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी प्रवीण शेट्टी, राजू (पूर्ण नाव नाही) व सात अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुपारी लालवाणी हे घरात असताना सात अनोळखी लोकांनी त्यांच्या घराचे प्रवेशद्वार व लाकडी दरवाजा लोखंडी राॅडने तोडून घरात प्रवेश केला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत प्रवीण शेट्टीच्या परत नादाला लागलास तर तुला खल्लास करू, अशी धमकी दिली. रविवारी (दि. २५)ही शेट्टी यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Filed a case against one in Dhamni