मिरजेत उत्तमनगरात दोन गटात मारामारी
By Admin | Updated: April 19, 2015 00:45 IST2015-04-19T00:45:38+5:302015-04-19T00:45:38+5:30
महिला जखमी : परस्परविरोधी तक्रार

मिरजेत उत्तमनगरात दोन गटात मारामारी
मिरज : मिरजेत उत्तमनगर परिसरात विनापरवाना बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर बांधकामास आक्षेप घेतल्याच्या कारणावरून शनिवारी दोन गटात मारामारी झाली. डोक्यात सळीने हल्ला झाल्याने रेणुका कांबळे (वय ४०) ही महिला जखमी झाली.
उत्तमनगरात किरण कांबळे यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परवान्यापेक्षा जास्त बांधकाम करण्यात येत असल्याची रेणुका कांबळे, शांता कांबळे व अन्य महिलांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. तक्रारीमुळे महापालिकेचे सहाय्यक नगररचनाकार एस. के. कांबळे हे शनिवारी दुपारी पाहणीसाठी आले असता, त्यांच्यासमोरच दोन्ही गटात मारामारी झाली. शांता कांबळे, रेणुका कांबळे, महादेव मन्नापगोळ यांना बेदम मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी किरण कांबळे व शांता कांबळे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात परस्पराविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नव्हती. (वार्ताहर)