मिरजेत चर्चच्या अध्यक्ष निवडीच्या वादातून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:26+5:302020-12-11T04:54:26+5:30

मारहाणीत महेश श्रीकांत कांबळे, नथया राजाराव बतुला, प्रभाकर पुट्टीकेला, गणेश रंगया रतन हे जखमी झाले असून, पेद्दा पुल्लाप्पा मनचाला, ...

Fighting over the election of the president of Miraj Church | मिरजेत चर्चच्या अध्यक्ष निवडीच्या वादातून मारामारी

मिरजेत चर्चच्या अध्यक्ष निवडीच्या वादातून मारामारी

मारहाणीत महेश श्रीकांत कांबळे, नथया राजाराव बतुला, प्रभाकर पुट्टीकेला, गणेश रंगया रतन हे जखमी झाले असून, पेद्दा पुल्लाप्पा मनचाला, चिन्ना पुल्लया मनचाला, पीटर मररी, शेखर मररी, व्यंकटेश मुन्नीशेट्टी (सर्व रा. समतानगर, मिरज) या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनशाला कशया व पेद्दा मनचाला यांनी महेश कांबळे यांना चर्चमध्ये पाचारण करुन चर्चच्या अध्यक्षांना पाठिंबा देत असल्याने झालेल्या मारहाणीबाबत न्यायालयात साक्ष दिली होती. याचा राग मनात धरून तसेच चर्चचा पूर्ण ताबा मिळावा व राजारा बत्तूला यांना अध्यक्षपदासाठी काही सदस्य पाठिंबा देत असल्याच्या रागातून जुना हरिपूर रस्त्यावर कांबळे यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तुम्हाला बघून घेतो, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fighting over the election of the president of Miraj Church