शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

सांगलीत ‘इंटरनेट कंपन्या वॉर’ भडकले, तिघांवर कोयत्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 12:48 IST

कंपन्यांमध्ये ग्राहक मिळविण्यावरून व ग्राहकांना अधिक गतीने इंटरनेट पुरविण्यावरून स्पर्धा रंगली आहे

सांगली : शहरात ‘केबल वॉर’ आता शांत झाले असतानाच, आता ‘इंटरनेट कनेक्शन कंपन्यांचे वॉर’ भडकू लागले आहे. शहरातील काँग्रेस भवन ते शिवाजी क्रीडांगण मार्गावर एका खासगी इंटरनेट कंपनीची वायर मध्यरात्रीच्या सुमारास तोडणाऱ्या तरुणांना रोखण्यावरून दोन गटांत जोरदार वादावादी झाली. यातून आठजणांनी तिघांना बेदम मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.याप्रकरणी शुभम चंद्रकांत खरमाटे (वय २६, रा. वंजारवाडी, ता. तासगाव) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खरमाटे याच्या फिर्यादीवरून वैजनाथ बोराडे, आशा साळुंखे, विशाल ननवरे, नीतेश मदने यांच्यासह अन्य अशा आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी शुभम खरमाटे यांची इंटरनेट सुविधा पुरविणारी प्राईम नेटवर्क इंटरनेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून, ते बाळासाहेब पवार यांच्यासोबत काम करतात. काँग्रेस भवन परिसर ते कॉलेज कॉर्नर परिसरात या कंपनीद्वारे सेवा दिली जाते. रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्यांची इंटरनेट सुविधा अचानक बंद पडली. काहीही कारण नसताना इंटरनेट सेवा बंद झाल्याने खरमाटे यांना संशय आला. त्यामुळे ते सहकारी पवार आणि कर्मचारी शुभम सूर्यवंशी यांना घेऊन केबल मार्गावर तपासणीस बाहेर पडले.त्यांना लिंगायत बोर्डिंग जवळील एका खांबावर काही तरुण शिडी लावून वायर तोडताना दिसले. त्यांनी धावत जात त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाठलाग केला असता, त्यांनी तिघांनाही दगड फिरकावून मारले व त्यानंतर सर्व संशयित दुचाकीवरून पळून जाऊ लागले. त्यानंतर त्या आठ तरुणांनी खरमाटे, पवार आणि सूर्यवंशी या तिघांनाही बेदम मारहाण करीत कोयत्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सर्व संशयितांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पर्धा वाढली

शहरात विविध दहा ते बारा खासगी कंपन्यांकडून आता इंटरनेटची सुविधा देण्यात येत आहे. विविध दूरसंचार कंपन्यांनी शहरभर केलेल्या ऑप्टिकल फायबर केबलचा यासाठी उपयोग होतो. कंपन्यांमध्ये ग्राहक मिळविण्यावरून व ग्राहकांना अधिक गतीने इंटरनेट पुरविण्यावरून स्पर्धा रंगली आहे. यातूनच एकमेकांच्या केबल तोडण्याचेही प्रकार घडत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीInternetइंटरनेट