मरळनाथपूर येथे दोन कुटुंबांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST2021-07-12T04:17:51+5:302021-07-12T04:17:51+5:30

इस्लामपूर : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे शेतातील हत्ती गवत कापण्याच्या कारणातून दोन कुटुंबांत हाणामारी झाली. त्यामध्ये दोघे जखमी झाले. ...

Fighting between two families at Maralnathpur | मरळनाथपूर येथे दोन कुटुंबांत हाणामारी

मरळनाथपूर येथे दोन कुटुंबांत हाणामारी

इस्लामपूर : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे शेतातील हत्ती गवत कापण्याच्या कारणातून दोन कुटुंबांत हाणामारी झाली. त्यामध्ये दोघे जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजता घडली. याबाबत पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

सुरेश रंगराव थोरात (मरळनाथपूर) आणि राहुल तानाजी पावणे (रेठरे धरण) अशी जखमींची नावे आहेत. या हाणामारीत कुऱ्हाडीचा दांडा, काठी आणि दगडांचा वापर दोन्ही बाजूंनी करण्यात आला. सुरेश थोरात याने दिलेल्या फिर्यादीत राहुल तानाजी पावणे, विक्रांत तानाजी पावणे, सचिन तानाजी पावणे, हृषीकेश विक्रांत पावणे, राजवर्धन विक्रांत पावणे (सर्व रा. रेठरे धरण) यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून आमच्या शेतातील गवत कापत असताना संगनमत करत काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे तर भाऊ सतीश याला ढकलून देत मारहाण केली.

राहुल पावणे याने दिलेल्या फिर्यादीत तो शेतातील गवत कापत असताना पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सुरेश आणि सतीश थोरात या दोघांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने हातावर आणि डोक्यात मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे. दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Fighting between two families at Maralnathpur