शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात सभापती पदासाठी फिल्डिंग

By admin | Updated: August 4, 2015 00:10 IST

बाजार समिती : जयंत पाटील, विलासराव शिंदे गट आक्रमक

अशोक पाटील - इस्लामपूर बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार, असाच रंग होता. परंतु आमदार जयंत पाटील यांच्या विरोधकांचा धुव्वा उडाला. सध्या मात्र सभापती निवडीसाठी जोरदार फिल्डिंग लागली असून दोन्ही गटातील संचालकांनी या पदासाठी दावा केला आहे. अंतिम टप्प्यात जयंत पाटील, विलासराव शिंदे आणि मानसिंगराव नाईक हे एकत्रित बसून यावर तोडगा काढणार आहेत. इस्लामपूर व तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीने सर्व जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या राजारामबापू शेतकरी विकास पॅनेल विरुध्द सर्वपक्षीय विरोधकांनी ताकद एकवटली होती. त्यामुळे विरोधकांच्या पदरात काही जागा पडतील असा अंदाज होता. परंतु मतदारांनी तो फोल ठरवला व बाजार समितीची एकहाती सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली.निवडून आलेल्या संचालकांमध्ये आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार विलासराव शिंदे यांचे समर्थक आहेत. यामुळे दोन्ही गटाच्या संचालकांनी आता सभापतीपद मिळविण्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. याबाबत जयंत पाटील गटाचे संचालक दिलीप देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, आपण सभापती पदासाठी इच्छुक आहे. जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून कृषी उत्पन्न बाजार समितीत दीड वर्ष सभापतीपद सांभाळले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. माझा अनुभव पाहता, मलाच जयंत पाटील सभापती पदाची संधी देतील, अशी आशा आहे असे ते म्हणाले.विलासराव शिंदे गटाचे संचालक व विद्यमान सभापती आनंदराव पाटील हे साखराळे गावचे आहेत. प्रत्येक निवडणुकीत या गावातून जयंत पाटील यांना नेहमीच मतांचे अधिक्य मिळते. त्यामुळेच जयंत पाटील या गावाला नेहमीच झुकते माप देत आले आहेत. कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील हेही याच गावचे आहेत. पंचायत समितीचे सभापतीपदही या गावाला मिळाले होते. आनंदराव पाटील हे विलासराव शिंदे गटाचे असले तरी, जयंत पाटील यांच्या मतदार संघातील आहेत. त्यामुळे त्यांनी सभापती पदावर पुन्हा दावा केला आहे.दरम्यान, शिंदे गटाचेच कणेगाव येथील अ‍ॅड. विश्वासराव पाटील यांची दुसऱ्यांदा बाजार समितीवर निवड झाली आहे. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठीही फिल्डिंग लावली होती. परंतु त्यांना थांबविण्यात आले. कणेगावातील ग्रामपंचायतीवर त्यांची सत्ता आहे. पाटील हे जयंत पाटील, विलासराव शिंदे आणि मानसिंगराव नाईक या तिघांनाही मानतात. त्यामुळे सभापती पदावर माझीच निवड होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.चमत्काराची शक्यता...सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपद निवडीवेळी अनेक ज्येष्ठ व माजी अध्यक्षांनी या पदावर दावा केला होता. परंतु जयंत पाटील यांनी ज्येष्ठ परंतु बँकिंग क्षेत्रात नवखे असलेले दिलीपराव पाटील यांना संधी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे आता इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीतही असाच चमत्कार घडण्याची शक्यता आहे.वाळवा तालुक्यात जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांचे गट असले तरी, राजकीय निर्णयात दोघेही एकत्र बसून निर्णय घेतात. सभापती व उपसभापती पदाची निवडही दोघे मिळूनच जाहीर करणार आहेत.