शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोघा शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 15:54 IST

जत : खोजानवाडी येथे एका महिला शिक्षिकेचा शाळेतील दोन शिक्षकांनी मुख्याध्यापकाचा पदभार का देत नाही म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी दोघा ...

जत : खोजानवाडी येथे एका महिला शिक्षिकेचा शाळेतील दोन शिक्षकांनी मुख्याध्यापकाचा पदभार का देत नाही म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी दोघा शिक्षकांवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी खोजानवाडी (ता. जत) येथे घडली.संबंधित महिला शिक्षिका ही जिल्हा परिषदेत गेली २५ वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षापासून त्याच्याकडे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, खोजनवाडी येथे प्रभारी मुख्याध्यापकचा कार्यभार आहे. याठिकाणी बाळू तुकाराम साळुंखे, अर्जुन महादेव माळी, उमेश कोळी, दिनेश चव्हाण असे शिक्षक काम पाहत आहेत. काल, २६ जानेवारी रोजी शाळेतील झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपवून संबंधित महिला शिक्षिका कार्यालयात एकट्या बसल्या होत्या. यावेळी शिक्षक बाळू सांळुखे व अर्जुन माळी त्यांच्या कार्यालयात गेले. दरम्यान, बाळु सांळुखे यांनी मला तुम्ही मुख्याध्यापकचा चार्ज का देत नाही, मला मुख्याध्यापकाचा चार्ज देणेबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांचेकडून पत्र दिले आहे, तरी सुध्दा तुम्ही मला सदर शाळेच्या मुख्याध्यापकाचा चार्ज देत नाही, असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. तर अर्जुन माळी यांनी ही बाई कसा चार्ज देत नाही ते अपण बघून घेवू असे म्हणून शिवीगाळी दमदाटी केल्याचे संबंधित महिला शिक्षकाने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात बाळू साळुंखे व अर्जुन माळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लवटे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस