शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दसऱ्याच्या सणाचे धुणे धुवायला गेले, तलावात बाप-लेक बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 11:42 IST

कवठेमहांकाळ : बंडगरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ...

कवठेमहांकाळ : बंडगरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) व त्यांचा मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (१८, रा. दोघेही करोली टी, ता. कवठेमहांकाळ) या बापलेकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १० राेजी सायंकाळी घडली. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली.करोली टी येथील राजेंद्र चव्हाण आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे घरातील धुणी धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. धुणे धूत असताना ते पाय घसरून पाण्यात पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलावालगतच्या ग्रामस्थांंना त्यांचे धुणे दिसले, मात्र जवळपास काेणी दिसत नसल्याने संशय आल्याने पाण्याजवळ जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह दिसले.घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. सांगलीच्या रेस्क्यू टीमचे महेश कुमारमठ, फिरोज शेख, अनिल कोळी, योगेश मेंढीगिरी, सय्यद राजेवाले, नीलेश शिंदे, गजानन नरळे यांनी दाेन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.रात्री दहाच्या सुमारास मृतदेह कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. रात्री उशिरा पोलिस कवठेमहांकाळ पाेलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, बाप-लेकांचा मृत्यू नेमका कसा झाला आहे, याबाबत लगेचच काही सांगता येणार नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू