आष्ट्यात पिता-पुत्राचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:01+5:302021-07-22T04:18:01+5:30

२)२१किरण पवार लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील आष्टा पीपल्स बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शहाजी पांडुरंग पवार (वय ६३) व ...

Father-son death due to corona in Ashta | आष्ट्यात पिता-पुत्राचा कोरोनामुळे मृत्यू

आष्ट्यात पिता-पुत्राचा कोरोनामुळे मृत्यू

२)२१किरण पवार

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील आष्टा पीपल्स बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शहाजी पांडुरंग पवार (वय ६३) व त्यांचा मुलगा किरण शहाजी पवार (वय ३४) (दोघे रा. शिराळकर कॉलनी आष्टा) या पिता-पुत्राचे चार दिवसाच्या अंतराने कोरोनामुळे निधन झाले. या घटनेने त्यांच्या मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

शहाजी पवार हे आष्टा पीपल्स बँकेतून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यांना मुलगा व मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले असून मुलगा इस्लामपूर येथील एका बँकेत नोकरीस होता. किरण याचे लग्न झाले असून त्याला चार वर्षाचा मुलगा व चार महिन्याची मुलगी आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने किरण यास ४ जुलै रोजी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना रविवार दि. १८ रोजी रात्री त्याचे निधन झाले.

दरम्यान गुरुवार दि. ८ रोजी शहाजी पवार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आष्टा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. पाठोपाठ त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल केले. दोघांवर उपचार सुरू असताना बुधवार दि. २१ रोजी शहाजी पवार यांचे निधन झाले. मुलाच्या मृत्यू पाठोपाठ चौथ्या दिवशी वडिलांचाही मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Father-son death due to corona in Ashta