बाप-लेक अग्रणी नदीत गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:35 IST2019-10-06T23:35:09+5:302019-10-06T23:35:18+5:30

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगाव येथे अग्रणी नदीत बुडून रविवारी पहाटे योगेश पवार (वय ३२) व त्यांची मुलगी श्रेया ...

Father-Lake carried the lead into the river | बाप-लेक अग्रणी नदीत गेले वाहून

बाप-लेक अग्रणी नदीत गेले वाहून

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगाव येथे अग्रणी नदीत बुडून रविवारी पहाटे योगेश पवार (वय ३२) व त्यांची मुलगी श्रेया पवार (७) यांचा मृत्यू झाला. योगेश यांचा पुतण्या या घटनेतून बचावला.
कवठेमहांकाळ तालुक्यातील सततच्या पावसाने मोरगाव येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. रविवारी योगेश पवार हे मुलगी श्रेया व पुतण्या ओेंकार पवार असे तिघेजण देशिंगहून कवठेमहांकाळकडे देवीच्या आरतीसाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मोरगावमधील पुलावरून पाणी वाहत होते. त्यातून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने, दुचाकीसह तिघेही वाहू लागले. ओंकार हा पोहत बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. सायंकाळी उशिरा बाप-लेकीचा मृतदेह सापडला.

Web Title: Father-Lake carried the lead into the river