शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ईदनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन मुलासह वडील जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:06 IST

आष्टा : आष्टा ते इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्याजवळ खडीचा डंपर व दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात ...

आष्टा : आष्टा ते इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्याजवळ खडीचा डंपर व दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात अश्फाक शब्बीर पटेल (वय ३९), त्यांचा मुलगा आश्रफ अश्फाक पटेल (वय १२) व आसद अश्फाक पटेल (वय १०) (तिघेही रा. कुंडलवाडी, ता. वाळवा) हे जागीच ठार झाले. तर हसीना अश्फाक पटेल (वय ३५) या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान झाला.आष्टा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलवाडी येथील अश्फाक शब्बीर पटेल हे पत्नी हसीना, मुलगा आश्रफ व आसद यांना दुचाकी क्रमांक (एमएच १० बीडी २८१९) वरून मिरज येथे ईदनिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते.मिरज येथे कपडे खरेदी केल्यानंतर ते आष्टा मार्गे कुंडलवाडीला निघाले होते. आष्टा ते इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्यामजीक हॉटेल नंदनवनजवळ आले असता, इस्लामपूरकडून आष्ट्याकडे खडी घेऊन येणाऱ्या डंपर क्रमांक (एमएच १० डीटी ०४६८) शी दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकी डंपरच्या उजव्या बाजूच्या पुढील चाकाखाली आली. हा अपघात इतका जोरदार होता की, दुचाकीस्वार अश्फाक शब्बीर पटेल यांच्यासह दोन मुले व पत्नी दुचाकीवरून उडून डंपरला धडकून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.यामध्ये अश्फाक पटेल यांच्यासह दोन्ही मुले आश्रफ व आसद हे तिघे जण जागीच ठार झाले, तर पत्नी हसीना अश्फाक पटेल या गंभीर जखमी झाल्या. त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अश्फाक पटेल, आश्रफ पटेल व आसद पटेल यांचे आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.घटनास्थळी आष्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत आवटे व संदीप शितोळे यांच्यासह आष्टा पोलिस उपस्थित होते. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

कुंडलवाडीवर शोककळा..कुंडलवाडी येथील अश्फाक पटेल हे सुप्रसिद्ध आचारी होते. पत्नी गृहिणी, आश्रफ पाचवीत व आसद तिसरीमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकत होता. वडिलांसह दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुंडलवाडीवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू