येडेमच्छिंद्र येेथे जमिनीसाठी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:20+5:302021-02-16T04:28:20+5:30
शिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील शेतजमिनीचा झालेला मुदत खरेदीचा व्यव्हार हा बेकायदेशीर असून, तो रद्द होण्याबाबत वारंवार मागणी ...

येडेमच्छिंद्र येेथे जमिनीसाठी उपोषण सुरू
शिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील शेतजमिनीचा झालेला मुदत खरेदीचा व्यव्हार हा बेकायदेशीर असून, तो रद्द होण्याबाबत वारंवार मागणी करूनही न्याय न मिळाल्याने अर्जुन जगन्नाथ लोहार हे सोमवारपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. उपोषणातूनही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही सुतार यांनी दिला आहे.
ते म्हणाले, शेतजमिनीचा मुदतखरेदीचा व्यवहार हा झालेला नसतानाही बोगस इंडेक्सव्दारे नोंद घातली आहे. हे बेकायदेशीर असल्याबाबत १७ डिसेंबर २०२० रोजी संबंधित विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. परंतु त्या अर्जावरती कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर मी १ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा अर्ज दिले होते. वारंवार तक्रारी अर्ज देऊन कोणत्याच विभागाने लक्ष दिलेले नाही. यामुळे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचाही मार्ग मी स्वीकारणार असल्याचे अर्जून सुतार यांनी सांगितले.