शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेवकाच्या खुन्यांच्या अटकेसाठी सांगलीत भर पावसात उपोषण

By संतोष भिसे | Updated: July 17, 2023 18:47 IST

सांगली : जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या खूनप्रकरणी प्रमुख संशयित उमेश सावंत याच्या अटकेसाठी ताड ...

सांगली : जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या खूनप्रकरणी प्रमुख संशयित उमेश सावंत याच्या अटकेसाठी ताड कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरु केले. सावंतला अटक होईपर्यंत उपोषण सुरुच राहील अशी माहिती आंदोलकांनी दिली.विजय ताडे यांचे भाऊ विक्रम यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना ३ जुलैरोजी निवेदन दिले होते. सावंत याला १७ जुलैपर्यंत अटक झाली नाही, तर उपोषणाचा इशारा दिला होता. यादरम्यान, अटकेची कार्यवाही न झाल्याने त्यांनी परिवार व मित्रांसह उपोषण सुरु केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, विजय ताड यांचा खून होईन चार महिने झाले, तरीही मुख्य संशयित सावंतला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. खून प्रकरणातील चार संशयितांना तातडीने अटक केली, सावंतला अटक करण्यात मात्र पोलिस उदासीनता दाखवत आहेत. पोलिस योग्य कार्यवाही करतील या अपेक्षेने आम्ही विश्वास ठेवला, पण अवहेलनाच करण्यात आली. आमच्या कुटुंबावर अन्याय केला.विक्रम ताड म्हणाले, सावंतच्या अटकेसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना वारंवार भेटलो, पण त्यांच्याकडून तीच ती उत्तरे मिळत आहेत. अटकेच्या दृष्टीने कोणतीही प्रगती झालेली नाही, त्यामुळे आमची सहनशीलता संपली आहे.आंदोलनात छाया ताड, वैभव ताड यांच्यासह अक्षय शिंगारे, सौरभ खराडे, किरण शिंदे, अनिल पारसे, योगेश पाटील, शिवाजी कोडोलीकर, संतोष  भोसले, रघुनाथ भोसले, सचिन शिंदे, शरद भोसले, निलेश भोसले, सागर शितोळे आदी सहभागी झाले आहेत.

उमेश सावंत नातेवाईकांच्या संपर्कातविक्रम ताड यांनी निवेदनात म्हटले आहे की, मुख्य संशयित उमेश सावंत नातेवाईकांच्या संपर्कात आहे, पण पोलिस नातेवाईकांवर दबावतंत्राचा वापर करत नाहीत. सावंतला पकडण्याकामी कोणताही कौशल्यपूर्ण तपास झालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलन