शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी न केल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील; राजू शेट्टी, संजय पाटील यांचा राज्य सरकारला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:58 IST

राज्यातील शेतकऱ्यांची ३० हजार कोटी कर्जमाफी होऊ शकते

सांगली : शासनाच्या कर्जमाफीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना ३० हजार कोटी रुपयांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते. शासनाने एक उच्च अधिकार समिती गठित करून जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामध्ये कोणतीही मर्यादा न घालता सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास राज्यातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी व माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.राजू शेट्टी म्हणाले, चालू वर्षे ३० हजार कोटी थकबाकी आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झालेल्या चर्चेत थकीत असणारे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. जो निव्वळ शेतकरी आहे, त्याचे कर्ज सरसकट माफ करा, अशीच आमची मागणी आहे.

वाचा - सांगली जिल्ह्यात ऊस दराबाबत बुधवारी निर्णय?, जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक

मात्र, यात पूर्वीप्रमाणे कर्ज मर्यादा घालू नयेत. राज्यात दर दोन तासांत एक शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतीमालाला भाव नाही, मोठ्या प्रमाणात शेती पडीक होत आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्षासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याला सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे.

फळबागांसाठी वेगळा निकष असावा : माजी खासदार संजय पाटीलमाजी खासदार संजय पाटील म्हणाले, सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे. यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मदत मिळाली. मात्र, ही मदत शेतकऱ्यांना पुरेशी नाही, एकरी अडीच ते तीन लाख केवळ उत्पादन खर्च आहे.

केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतून २४०० कोटी शेतकऱ्यांचे कर्ज आहे, ते माफ करायला जून २०२६ उजडणार आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांंची थकबाकी वसूल होऊ नये. शिवाय, सीबिल खराब नको, आशा मागण्या आम्ही शासनाकडे करणार आहोत. शासनानेही बँकांना मदत केली पाहिजे. कर्जमाफीत कुणाला माफी देणार तेही शासनाने जाहीर करावे, अशीही त्यांनी मागणी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer leaders warn government: face protests if loan waivers delayed.

Web Summary : Farmer leaders warn of renewed protests if blanket loan waivers aren't granted. They demand immediate debt relief without limits, citing farmer suicides and crop losses due to natural disasters. They seek special consideration for fruit farmers.