शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शेतकरी संघटनेने कर्नाटकातील साखर वाहतूक रोखली, राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

By शीतल पाटील | Updated: October 17, 2023 14:44 IST

'वेळप्रसंगी साखरेचे ट्रक जाळणार'

इस्लामपूर : गतवर्षी गाळप केलेल्या उसाला दिवाळीआधी १ हजार रुपये द्या. चालू गळीत हंगामात प्रतिटन ५ हजार रुपये भाव द्यावा, अन्यथा दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी करत रघुनाथदादा पाटीलप्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिपाणी - कामेरीदरम्यान बेळगाव येथून मुंबईकडे जाणाऱ्या शिवशक्ती कारखान्याची साखर वाहतूक तासभर रोखून धरली. उद्यापासून गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा देत वाहने सोडण्यात आली.सोमवारी रात्री ९:०० च्या सुमारास बेळगावहून मुंबईकडे जाणारा साखरेचा भरलेला ट्रक येडेनिपाणी - कामेरी दरम्यान आशियाई महामार्गावर शिवशक्ती शुगर बिद्री कारखान्याची ३५ टन साखर भरलेला ट्रक अडवून ट्रक चालकास दोन तास थांबवून ठेवण्यात आले. कारखाना प्रशासनाने पुन्हा साखर पाठवणार नाही, असे सांगितल्यावरच ट्रक सोडला. जोपर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा सर्व कारखानदार मागील वर्षीच्या गाळप केलेल्या उसाला दिवाळीआधी १ हजार रुपये, चालू गळीत हंगामात प्रतिटन ५ हजार रुपये भाव द्यावा, हे जमत नसेल तर दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष प्रणव पाटील, विनोद चव्हाण, वैभव दाइंगडे, कृष्णात पाटील, दीपक पवार, अविनाश चव्हाण उपस्थित होते.

वेळप्रसंगी साखरेचे ट्रक जाळणार : हणमंत पाटीलमंगळवारपासून सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी दोन दिवसांच्या आत निर्णय घेतला नाही तर गनिमी काव्याने मुंबईला जाणारी साखर, दूध, भाजीपाला बंद करणार. वेळप्रसंगी साखरेचे ट्रक ही जाळणार. कोणताही शेतीमाल मुंबई पुण्यास जाऊ देणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील एकही दुधाचा टँकर कोणत्याही मार्गे जाऊ देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना