शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

सांगलीतील शेटफळे येथे 'शक्तिपीठ'च्या मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पथकाला जावे लागले माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:31 IST

एकरी दीड कोटींच्या भरपाईबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथून जात असणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी होत असणाऱ्या मोजणीस विरोध केला. आधी एकरी दीड कोटी रुपये भरपाई जाहीर करावी मगच मोजणी करावी, असा पवित्रा घेतल्याने मोजणी न करताच मोजणी पथकाला माघारी जावे लागले आहे. दरम्यान याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसीलदार सागर ढवळे यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला आहे.शेटफळे येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी ‘महामार्गाला विरोध नाही, मात्र आधी एकरी दीड कोटी रुपये भरपाई जाहीर करा, मगच मोजणीसाठी शेतात पाय ठेवा’, अशी आक्रमक भूमिका घेतली. शक्तिपीठ महामार्ग आटपाडी तालुक्यातील शेटफळेमधून जाणार आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी निशाणी केल्या होत्या. गावातील ६३ गटातील दीडशे एकर क्षेत्रातून हा महामार्ग जाणार आहे. यामध्ये २०० हून अधिक शेतकरी बाधित होणार आहेत.शेतकऱ्यांनी तेथे बंगले बांधले आहेत. डाळिंब, द्राक्षबागा, शेततळी, विहिरी, जलवाहिन्या आहेत. पाणी आल्याने तलावातील गाळ भरून शेती विकसित केली आहे. या शेतीतून उत्पन्न सुरू झाले आहे. महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. परिणामी अनेक शेतकरी कायमचे विस्थापित होण्याची भीती आहे.

शेतकऱ्यांना भीती घालण्याचा प्रयत्नमोजणीस विरोध केल्यानंतर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भरपाईवर चर्चा न होता. अधिकारी कायद्याची भीती दाखवतात. विरोध कराल तर भरपाई कमी देऊ. न्यायालयात गेल्यास आणखी कमी भरपाई देऊ, अशी भीती घातली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले आहेत. ‘आधी भरपाई जाहीर करा, मग पुढील प्रक्रिया राबवा. भीती दाखवणे थांबवा, अन्यथा महामार्गालाच विरोध करू,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर घेतली.

शेतकऱ्यांचा विरोध 'शक्तिपीठ'ला नाही. आधी भरपाई एकरी दीड कोटी जाहीर करावी. मात्र तसे न करता अधिकारी भीती दाखवत आहेत. - शशिकांत मोरे, बाधित शेतकरीशक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना भरपाई कोणत्याप्रकारे व कशी मिळणार आहे, याची माहिती दिली आहे. त्यांचा महामार्गास विरोध नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - डॉ. विक्रम बांदल, उपविभागीय अधिकारी विटा.

टॅग्स :SangliसांगलीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गFarmerशेतकरी