शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Sangli- शक्तिपीठ महामार्ग: ..तर भडका उडेल, महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समितीने दिला इशारा 

By संतोष भिसे | Published: March 18, 2024 5:26 PM

हरकती दाखल करण्यास सुरुवात, नदीकाठची गावे वगळण्याची मागणी

सांगली : शक्तिपीठ महामार्ग सक्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास भडका उडेल. जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा महामार्गविरोधीशेतकरी संघर्ष समितीने दिला. मिरज, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मिरजेत प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकाऱ्यांकडे सोमवारी मोठ्या संख्येने हरकती दखल केल्या.शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीने शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ मार्चरोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार २१ दिवसांत म्हणजे २८ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात हरकती व आक्षेप दाखल करता येणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी झाली. हरकतींमध्ये म्हटले आहे की, आमच्या जगण्याचे एकमेव साधन असलेल्या बागायती जमिनींतून महामार्ग गेल्याने आम्ही उध्वस्त होणार आहोत. कुटुंबवाढीमुळे आमच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत. महामार्गामुळे अनेक कुटुंबे भूमिहीन होणार आहेत. जमिनींसाठी दडपशाही केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. निवेदन देण्यासाठी समितीचे समन्वयक दिगंबर कांबळे, शरद पवार, घनशाम नलवडे, प्रवीण पाटील, भूषण गुरव, दत्तात्रय बेडगे,  गजानन सावंत, विष्णू सावंत, आनंदा मोरे, वामन कदम, शिवाजी शिंदे, अमर शिंदे, रमेश कांबळे, राहुल जमदाडे, राजेंद्र जमदाडे, सनी करीम, शिवराज पाटील, राहुल खाडे, सुनील कांबळे, प्रशांत कांबळे, प्रदीप इसापुरे, निलेश पाटील आदी उपस्थित होते.

भरपाईत गुंठाभरही जमीन नाहीदिगंबर कांबळे यांनी सांगितले की, जमिनींसाठी गुणांक एकनुसार मोबदला मिळणार आहे. तो अत्यल्प आहे. या पैशांतून अन्यत्र गुंठाभर जमीनही मिळणार नाही. त्यामुळे भूसंपादनास आमची हरकत आहे. खासगी वाटाघाटीने जमिनींचे मूल्यांकन निश्चित करावे. प्रतिएकरी किमान दोन कोटी रुपये मोबदला मिळावा. औद्योगिक वसाहत व व महापालिका क्षेत्रात किमान चार कोटी रुपये मिळावेत. नदीकाठची पूरबाधित गावे महामार्गातून वगळावीत.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी