शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे १०६३ कोटी कर्ज थकीत, कर्जमाफीसाठी शासनाने माहिती मागविली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:07 IST

जूनपूर्वी होणार कर्जमाफीची घोषणा

सांगली : जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यासाठी ३० जून २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने बँकांकडून मागविली आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ६२,५७१ शेतकऱ्यांकडे मूळ कर्ज आणि त्यावरील व्याज असे एकूण एक हजार ६३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासंदर्भात अहवाल राज्य शासनाकडे जिल्हा बँक प्रशासनाने पाठविला आहे. दरम्यान, शासनाने १९९० पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीही स्वतंत्र मागविली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!जिल्हा बँकेने त्यांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार खात्याच्या पोर्टलवर अपलोड केलेली आहे. दुसरीकडे सहकार विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार पुढील महिन्यांत एप्रिलमध्येच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पाच ते सात वर्षांनंतर कर्जमाफी का मागावी लागते, दरवर्षी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी थकबाकीत जातात, त्यांची पीक पद्धती, तेथील जमीन व पाण्याची सोय, हवामान या बाबींचा अभ्यास कृषी विभागाकडून केला जात आहे. राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीचा अहवाल शासनाला सादर होणार आहे. त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. कर्जमाफीसाठी राज्यात साधारणतः ३५,४७७ कोटी रुपये लागणार आहेत. ३० जून २०२५ पर्यंत राज्यातील २४,७३,५६६ शेतकऱ्यांकडे ३५,४७७ कोटींची थकबाकी आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील एकट्या जिल्हा सहकारी बँकेतील ६२,५७१ शेतकरी थकबाकीत आहेत. या शेतकऱ्यांकडे ३० जून २०२५ अखेरपर्यंत ७२९ कोटी रुपये कर्ज आणि ३३४ कोटी रुपयांचे व्याज असे एकूण एक हजार ६३ कोटी रुपये थकबाकी आहे. या संबंधीची सर्व माहिती सहकार खात्याच्या पोर्टलवर अपलोड केली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

मयत थकीत शेतकऱ्यांच्या वारसांनी बँकेशी संपर्क साधावा : शिवाजीराव वाघजिल्हा बँकेच्या ८०० शेतकऱ्यांचे कर्ज थकीत असून, ते मयत झाले आहेत. शासनाने थकीत कर्जाची माहिती मागविली असून, त्यांच्या वारसांनी आधार कार्ड (वारसांचे), वारसांचे संमती प्रमाणपत्र, इतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्राथमिक कृषी पतसंस्था, विकास संस्था, जिल्हा बँकेच्या शाखेशी तीन दिवसांच्या आत संपर्क साधण्याची गरज आहे. मुदतीनंतर आलेल्या प्रकरणांची वैयक्तिक जबाबदारी संबंधितांची राहील. मुदत संपल्यानंतर कर्जमाफीसंदर्भात कोणताही हक्क मागता येणार नाही, असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांचे आवाहनजिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. अशा शेतकऱ्यांकडून कर्जाची माहिती शासनाने मागविण्यात आली असून, माहिती सादर करण्याचे आवाहन बँकांकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Farmers Owe ₹1063 Cr; Government Seeks Loan Waiver Data.

Web Summary : Sangli farmers face ₹1063 crore debt. Government seeks data for loan waivers up to June 2025. Study underway for long-term solutions.