शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

Sangli: भू-संपादनाचा मोबदला मिळाला नाही, पुणदी-जुनेखेड नदी पुलाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांनी केला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:24 IST

वीस वर्षांपासून नाही मिळाला जमिनीचा मोबदला

किर्लोस्करवाडी : पलूस आणि वाळवा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुणदी-जुने खेड नदीवरील पुलाला अठरा वर्षे पूर्ण झाली. मात्र या पुलाच्या उत्तरेकडील बाजूने जाणाऱ्या रस्त्यासाठी सक्तीने केलेल्या भू संपादनाचा आजअखेर मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे तीस शेतकऱ्यांनी हा रस्ता गेल्या पाच सहा महिन्यांपासून बंद केला आहे.दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी २००७ साली या पुलाचे उद्घाटन करून वाळवा आणि पलूस या दोन तालुक्यांना जोडायचे काम केले होते. यामुळे पलूस तालुक्यातील लोकांना वाळवा, इस्लामपूर या ठिकाणी जाण्यासाठी व तिकडच्या लोकांना इकडे येण्यासाठी सोय झाली होती. तसेच यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत झाली. मात्र, संबंधित पुलाच्या उत्तरेकडून २५ शेतकऱ्यांच्या एकत्रित पाच ते सहा एकर जमिनीचे सक्तीने भू संपादन केले होते. या शेतकऱ्यांना त्यावेळी तुम्हाला लवकरच मदत देतो असे आश्वासन प्रशासनाने देऊन देखील आजअखेर वीस वर्षे लोटली तरीही एका रुपयाची मदत शेतकऱ्यांना दिली नाही. हा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातून बरोबर मधून गेल्याने शेताचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे मशागतीसह सर्वच कामाला त्रास होत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चरी काढून रस्ता बंद केल्याने ऊस वाहतुकीसह इतर मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. तसेच इतर सर्व वाहतूक बंद झाल्याने दळणवळण ठप्प आहे. लवकरात लवकर भरपाई न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशांत दमामे, चैतन्य पाटील, रघुनाथ पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह बाधित सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे.

पुणदी-जुनेखेड नदी पुलाकडे जाणाऱ्या पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी माझी संपूर्ण २३ गुंठे जमीन गेल्याने मी भूमिहीन झालो आहे. आता मी खायचे काय? आणि जगायचे कसे हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. - मोहन यादव, बाधित शेतकरी.प्रांताधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित जागेची लवकरच फेर मोजणी करून मूल्यांकनाचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल. - धीरज माने, सहायक अभियंता, श्रेणी २, सार्वजनिक बांधकाम विभाग, पलूस.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Farmers Block Road Over Unpaid Land Compensation for Bridge.

Web Summary : Farmers in Sangli blocked the Pundi-Junekhed bridge road due to unpaid compensation for land acquired 20 years ago. The road construction divided farms, disrupting work. Affected farmers threaten hunger strike if not compensated soon.