शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय द्वेषातून माझ्यावर भाजपकडून खोटे गुन्हे, पुरावा द्या राजकारण सोडतो; मनोज सरगराचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 12:12 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव भाजपच्या जिव्हारी लागला

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवामुळेच राजकीय हेतूने कटकारस्थान करून माझ्यावर व सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला गेला. यापूर्वी माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. तरीही मला गुंड म्हटले जात आहे. याचे आश्चर्य वाटते. भाजपने माझ्याविरुद्ध एक तरी पुरावा द्यावा, मी नगरसेवक व युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, असे आव्हान नगरसेवक मनोज सरगर यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिले.सरगर म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला. निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीत मी नव्हतो. तलवारी नाचवण्याचा, दहशत पसरवण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. हे भाजपचे कटकारस्थान आहे. ज्या ठिकाणी तलवारी नाचवल्या त्यासह संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावे. त्यात कुठेही मी किंवा माझे सहकारी गैर कृत्य करताना आढळल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केली होती.पोलिसांनाही ही वस्तुस्थिती माहिती होती. त्यामुळे त्यांनी गुन्हे दाखल करण्यास नकार दिला होता. मात्र भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पोलिसांवर राजकीय दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे शहर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष हर्षद कांबळे म्हणाले, नगरसेवक मनोज सरगर व त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलिसप्रमुखांकडे केली आहे.

भाजपच्या आंदोलनात गुन्हेगारांचा सहभागमनोज सरगर म्हणाले, भाजप मला गुंड म्हणत आहे. पण माझ्यावर आजपर्यंत एकही गुन्हा नाही. मग मी गुंड कसा?, याउलट माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी संजयनगर पोलिस स्टेशनच्या आवारात भाजपच्या संघटन मंत्र्यांनी आंदोलन केले. त्या आंदोलनातच खुनाच्या गुन्ह्यात आरोप असलेला एक जण सहभागी होता. अन्यही गुन्हेगार तेथे होते. त्यामुळे माझ्यावर गुंडगिरीचे भाजपचे आरोप म्हणजे ' चोराच्या उलट्या बोंबा ' आहेत, अशी टीका केली.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपा