शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यात सत्ताधारी अपयशी, शरद पवार यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:09 IST

'महाराष्ट्र सावरण्याची व पुढे नेण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकतोय'

इस्लामपूर (जि. सांगली) :  सत्तेचा दर्प चढलेल्या राज्य आणि केंद्रातील सरकारला लोकसभा निवडणुकीत जनतेने जागा दाखवल्यावर त्यांना अनेक योजना आठवत आहेत. त्यातच त्यांना लाडकी  बहिण आठवली. मात्र तिची सुरक्षा करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सत्ता कोणाच्या हाती द्यायची? सन्मान करणाऱ्यांच्या ? की अत्याचार करणाऱ्यांच्या याचा निर्णय आता जनतेनेच घ्यायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या  शिवस्वराज्य यात्रेची सांगता खा. पवार यांच्या उपस्थितीत झाली. मुसळधार पाऊस पडूनही वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत पवार यांना दाद दिली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, नीलेश लंके, आमदार सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, माजी खासदार श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील बहिणींच्या सन्मानासाठी कायमस्वरूपी व टिकाऊ निर्णय घेतले. त्यामुळे आमच्या माता-भगिनी सरपंच, सभापती, अध्यक्ष व महापौर झाल्या. लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने सत्ताधाऱ्यांना जागा दाखविली. आता अडचणीत आल्यावर त्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली आहे. म्हणून त्यांच्या हातावर काही रक्कम ठेवली जातेय. पण, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले. पुण्यातील सासवडजवळ अत्याचार झाला. सांगलीत चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार झाला. ही अत्याचाराची परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली, याचा विचार जनतेने करायला हवा.महाराष्ट्र मागे गेला..हल्ली ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्र एकाही क्षेत्रात पुढे नाही. दक्षिण व उत्तरेकडील काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे गेलेला दिसतो. महाराष्ट्र सावरायचा व पूर्व स्थितीत आणण्याचे काम आम्हाला करायचे आहे. त्याची सुरुवात आज साखराळेतून (ता. वाळवा) होत आहे. या वाळवा व शिराळा तालुक्यातून देशाच्या स्वातंत्र्याचा संघर्ष सुरू झाल्याचा इतिहास आहे. बिळाशीचा सत्याग्रह येथून झाला. राजारामबापू पाटील यांनी येथूनच साखर कारखान्याची सुरुवात केली. आता महाराष्ट्र सावरण्याची व पुढे नेण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकतोय, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Jayant Patilजयंत पाटीलladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा