मागील जन्मीचे पाप म्हणून कारखाना काढला; गडकरींनी व्यक्त केली साखर उद्योगासमोरील चिंता म्हणाले, ऊसाचा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:21 PM2018-12-23T22:21:19+5:302018-12-23T22:23:01+5:30

सांगली : ‘‘साखर कारखाना काढून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे मला नेहमी वाटते. मागील जन्मी जे पाप करतात, तेच ...

 The factory was removed as a previous born; Gadkari expressed concern over the sugar industry, saying that the question of sugarcane should not be tabled ... | मागील जन्मीचे पाप म्हणून कारखाना काढला; गडकरींनी व्यक्त केली साखर उद्योगासमोरील चिंता म्हणाले, ऊसाचा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये...

मागील जन्मीचे पाप म्हणून कारखाना काढला; गडकरींनी व्यक्त केली साखर उद्योगासमोरील चिंता म्हणाले, ऊसाचा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये...

Next

सांगली: ‘‘साखर कारखाना काढून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे मला नेहमी वाटते. मागील जन्मी जे पाप करतात, तेच या जन्मी साखर कारखाना काढतात, अशी मिश्कली करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर उद्योगासमोरील चिंता व्यक्त केली.’’
सांगली जिल्ह्यातील नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे विविध महामार्गांचे भूमिपूजन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले की, साखर कारखानदारीवर गेल्या काही वर्षांपासून चुकीचे राजकारण सुरू आहे. हे कारखाने म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी याचे भान ठेवायला हवे. देशात १९ आणि २० रुपये किलोने साखर विक्री होत असताना महाराष्टÑात ३४ रुपयांची एफआरपी दिली आहे. कारखान्यांना यावर्षीच पॅकेज देणे शक्य आहे. भविष्यात असे कोणतेही पॅकेज कारखान्यांना मिळणार नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करून कारखाने बंद पाडले तर शेतकºयांचा ऊस तसाच पडून राहील आणि नुकसान त्यांचेच होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये, अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title:  The factory was removed as a previous born; Gadkari expressed concern over the sugar industry, saying that the question of sugarcane should not be tabled ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली