शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 16:29 IST

महापालिकेची अर्थ समिती मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसाठी दिग्गज नगरसेवक इच्छुक होते.

शीतल पाटील

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीसह महिला, बालकल्याण, समाजकल्याण समिती सभापती पदांच्या निवडी शुक्रवारी बिनविरोध पार पडल्या. पण, या निवडीतून भाजपअंतर्गत संघर्षाची पहिली ठिणगी पडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पार पडलेल्या या निवडीला नाराजीची किनार आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेत पहिल्यांदाच भाजपला पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली. पहिल्या वर्षभराच्या कारभारात फार मोठी झेप भाजपला घेता आली नाही. अगदी मुख्यमंत्र्यांनी दिलेले शंभर कोटी रुपयेही वर्षभराच्या कालावधित खर्च झालेले नाहीत. यातील कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्या तरी, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. गतिमान आणि पारदर्शी कारभारासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली. आता या कोअर कमिटीतील सदस्यांच्या हेतूवरच नगरसेवक संशय घेऊ लागले आहेत.

महापालिकेची अर्थ समिती मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसाठी दिग्गज नगरसेवक इच्छुक होते. मिरजेतून गणेश माळी, कुपवाडमधून गजानन मगदूम यांची नावे पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होती. पहिल्यावर्षी सांगलीला संधी दिल्याने आता सभापतीपद मिरज अथवा कुपवाडला दिले जाणार, हे स्पष्ट होते. माळी व मगदूम यापैकी कोण? अशी चर्चा सुरू असतानाच शेवटच्याक्षणी संदीप आवटी यांनी बाजी मारली. त्यामुळे माळी आणि मगदूम हे दोघेही नाराज झाले. स्थायी सदस्य निवडीवेळी ही भाजपअंतर्गत नाराजी उफाळून आली होती. मिरजेतून शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने हे सदस्यपदासाठी इच्छुक होते. पण या दोघांनाही डावलून मोहना ठाणेदार यांची स्थायी सदस्यपदी वर्णी लागली. त्यानंतर देवमाने यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत थेट भाजपविरोधात आघाडी उघडली. कुपवाड जागा खरेदी, पथदिव्यांच्या प्रस्तावाला त्यांनी उघडपणे विरोध केला. ‘आमचा बाप कोअर कमिटीत नाही म्हणून आम्हाला पदे मिळत नाहीत’, अशी प्रतिक्रिया एका नगरसेवकाने सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर दिली होती. या प्रतिक्रियेतून नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येते.समाजकल्याण समितीमध्येही सारे काही आलबेल नाही. स्नेहल सावंत यांनी थेट नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची धमकी दिल्याची चर्चाही सुरू आहे. त्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने भाजपला सावंत यांची नाराजी न परवडणारी होती. त्यामुळे इतर सदस्यांची नाराजी ओढवून घेत भाजप नेतृत्वाने सावंत यांना सलग पाचव्यांदा सभापतीपदाची संधी दिली. 

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाMuncipal Corporationनगर पालिका