शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

बेळगावी-मिरज विशेष पूर रेल्वे साताऱ्यापर्यंत वाढवा

By अविनाश कोळी | Updated: July 31, 2024 16:30 IST

रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्यांची मागणी

सांगली : सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयूसीसी) सदस्यांनी केली आहे.समितीच्या सदस्या नम्रता तिवारी यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सांगली, कराड, भिलवडी, ताकारी, किर्लोस्करवाडी, सातारा याठिकाणी मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा, येरळा या नद्या ओसंडून वाहत आहेत. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी ३९ फूट तर मिरजेत ५० फूट आहे. सातारा, कराडपासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोयना धरणातून आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली सातारा जिल्ह्यातील बरेच पूल व रस्ते पाण्याखाली गेले आहेत.सांगली विभागातील ८२५ एसटी बसेस रद्द केल्या आहेत. सातारा व कराड येथूनही अनेक एसटी बसेस रद्द केल्या आहेत. सातारा, कराड, सांगली ते कर्नाटक बसेस तसेच सांगली ते पुणे बसेस रद्द झाल्या आहेत.दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने १ ऑगस्ट ते ४ ऑगस्टदरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बेळगाव-मिरज विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे गेलेले कर्नाटकातील पर्यटक मिरज जंक्शनपर्यंत १८० कि.मी. अंतरावर जाऊन ही विशेष गाडी पकडू शकत नाहीत. त्यासाठी सातारा ते बेळगावी थेट गाडी हवी. प्रत्येक वेळी सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, भिलवडीच्या लोकांनी मिरजेत येऊनच कर्नाटक जाणारी रेल्वे पकडावी, असा आग्रह मध्य रेल्वे करते. त्यामुळे खूप गैरसोय होत आहे.बसेस पुरामुळे धावत नसल्याने आणि लोक अडकून पडल्यामुळे बेळगावी-मिरज पूर विशेष गाडी सातारा स्थानकापर्यंत वाढवावी. नैसर्गिक आपत्तीच्या काळात दक्षिण पश्चिम रेल्वे लोकांना मदत करत आहे. बेळगावी-सातारा विशेष रेल्वे चालवून मध्य रेल्वेने लोकांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजSatara areaसातारा परिसरrailwayरेल्वे