तासगाव : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील सुतारगल्ली परिसरात शोभेच्या दारूचे काम करत असताना दारूचा स्फोट झाल्यामुळे सहाजण जखमी झाले. रविवारी (दि.२८) ही घटना घडली असून जखमीपैकी एकजण गंभीर जखमी असून पाच जणांना किरकोळ भाजले आहे. घटनास्थळी तासगाव पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.कवठे एकंद येथे दसऱ्यानिमित्त शोभेचे दारूकाम करण्याची प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर शोभेचे दारूकाम करण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. रविवारी दुपारी सुतारगल्ली परिसरात सार्वजनिक मंडळाकडून शोभेचे दारूकाम बनवण्याचे काम सुरू होते. शोभेचे दारूकाम करत असताना झालेल्या स्फोटातील आशुतोष बाळासाहेब पाटील (वय १६) हा एक गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर आनंद नारायण यादव (वय ५५), विवेक आनंदराव पाटील (वय ३८), गजानन शिवाजी यादव (वय २९), अंकुश शामराव घोडके (वय २९), प्रणव रवींद्र आराध्ये (वय २२), ओमकार रवींद्र सुतार (वय २९) हे किरकोळ जखमी आहेत. जखमींना उपचारार्थ सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास तासगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Web Summary : A fireworks explosion in Kavathe Ekand, Sangli, injured six people, one seriously. The incident occurred during fireworks preparation for Dussehra celebrations. Injured individuals are receiving treatment in a Sangli hospital. Police are investigating.
Web Summary : सांगली के कवठे एकंद में पटाखे बनाते समय विस्फोट में छह लोग घायल हो गए, जिनमें से एक गंभीर है। दशहरा उत्सव के लिए पटाखे तैयार करते समय यह घटना हुई। घायल व्यक्तियों का सांगली के एक अस्पताल में इलाज चल रहा है। पुलिस जांच कर रही है।