शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तासगावात महिला तंत्रनिकेतनच्या खानावळीत स्फोट, अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:03 IST

विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण 

तासगाव : येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या मेसमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मेसमध्ये जेवण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनींनी एकदम मेस बाहेर धाव घेतली. घटनेनंतर तात्काळ तासगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.तासगाव मणेराजुरी रस्त्यालगत शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन आहे. या तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आहेत. मंगळवारी रात्री जेवणासाठी मुली मेसमध्ये आल्यानंतर काही मुली जेवणाच्या प्रतीक्षेत होत्या, तर काही मुली जेवण करीत होत्या. याच वेळी अचानक किचनमध्ये गॅसचा स्फोट झाला. आगीचा भडका उडाला.स्फोट झाल्यानंतर सर्व मुलींनी मेसच्या बाहेर धाव घेतली. किचन पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडले होते. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी हजर झाल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. किचनमध्ये आणखी चार गॅसचे सिलिंडर असल्याची माहिती मिळाली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणून सर्व सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक सचिन थोरबोले, तहसीलदार अतुल पाटोळे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मुलींमध्ये भीतीचे वातावरणजेवणासाठी आल्यानंतर अचानक स्फोट झाल्यामुळे मेसमध्ये मोठी खळबळ उडाली. मुलींची संख्या मोठी असल्यामुळे बाहेर पडण्यासाठी सर्व मुलींनी एकदम धाव घेतली. स्फोटामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक मुलींना अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीfireआगStudentविद्यार्थी