शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

युरियासह महाग खताचे लिंकिंग

By admin | Updated: September 16, 2014 23:42 IST

शेतकऱ्यांची लुबाडणूक : कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सांगली : जय किसान युरियाचे युनिट दोन महिन्यांपासून बंद असल्यामुळे जिल्ह्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे़ अन्य कंपन्यांचा युरिया उपलब्ध आहे़ पण, युरिया खताच्या ५० किलोच्या पोत्यासाठी आरसीएफचे १९:१९:१९ ड्रिपचे खत अथवा १८:१८:१८ हे महागडे खत घेण्याची सक्ती केली जात आहे़ डीलर आणि कृषी सेवा केंद्र चालकांच्या लिकिंगमध्ये गरीब शेतकरी भरडला जात असूनही याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे़ याबद्दल शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत़खत कंपन्यांकडून महागडी आणि फायदा मिळवून देणारी खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा उद्योग नेहमीच सुरु असतो़ प्रत्येकवेळी शेतकऱ्यांकडून मागणी असणाऱ्या खताची कधी कृत्रिम, तर कधी नैसर्गिक टंचाई दाखवून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे़ डीलरलाही महागड्या खतासाठी जादा कमीशन मिळत असल्यामुळे तेही गुपचूप कृषी सेवा केंद्र चालकांशी लिंकिंगद्वारे खताची विक्री करीत आहेत़ परंतु, काही कृषी सेवा केंद्र चालकांचे लिंकिंग खतामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे़ कारण, सध्या युरिया खताची जिल्ह्यात टंचाई आहे़ या पार्श्वभूमीवर डीलरकडून दहा टन युरिया खताबरोबर कृषी सेवा केंद्र चालकांना १८:१८:१८ खत अथवा आरसीएफचे १९:१९:१९ ड्रिपचे खत घेण्याची सक्ती केली जात आहे़ साध्या युरियाचा ५० किलो पोत्याचा दर २८२ रुपये आणि निम कोटेडचा दर २९२ रुपये आहे़ या खताबरोबर ९८० रूपये किमतीचे १८:१८:१८ हे खत अथवा २१५० रूपये किमतीचे आरसीएफचे १९:१९:१९ ड्रिपचे खत घेण्याची सक्ती केली जात आहे़ पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबरच उसासाठी शेतकऱ्यांतून युरियाला मागणी आहे़ परंतु, शेतकऱ्यांची ही गरज ओळखून खताचे मुख्य वितरक आणि कृषी सेवा केंद्र चालक लिंकिंगद्वारे त्यांची आर्थिक लूट करीत आहेत़ याविरोधात शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत़ (प्रतिनिधी)