शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

थकीत जीएसटी प्रकरण: वसंतदादा कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालकांवर दोषारोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:25 IST

कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व इतर १६ संचालकांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे.

सांगली : वसंतदादा कारखान्याच्या मद्यार्क (डिस्टलरी) विभागाने ९ कोटी ८ लाख रुपये जीएसटी भरला नसल्याप्रकरणी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने मागील वर्षी कारखाना अध्यक्षांसह सर्व संचालकांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास करुन संजयनगर पोलिसांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सर्वांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती जीएसटी विभागाने दिली.जीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मद्यार्क विभागाने ऑक्टोबर २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीतील दाखल केलेल्या विवरणपत्रकानुसार एकूण रुपये ९ कोटी ८ लाख इतका करभरणा केलेला नव्हता. म्हणून तत्कालीन राज्य कर उपायुक्त श्रीमती शर्मिला मिस्कीन यांच्या तक्रारीवरून ९ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून संजयनगर पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व इतर १६ संचालकांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे.

आर्थिक अनियमिततेमुळे कारखाना ऑक्टोबर २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीसाठी करभरणा करू शकला नाही. सांगलीतील राज्य वस्तू व सेवा कर विभागाने या थकबाकीच्या वसुलीसाठी अनेकदा प्रयत्न केले. तरीही करभरणा न झाल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. थकबाकी वसुलीसाठी यापूर्वीच कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा नोंदविला असून, आता दोषारोपपत्र दाखल झाल्याने कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या सहआयुक्त श्रीमती सुनीता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या वसुलीचा पुढील पाठपुरावा राज्य कर उपायुक्त कवींद्र. का. खोत (रणमोडे) यांच्याकडे सोपविला आहे.राज्य वस्तू व सेवा कर विभागाने थकबाकी वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. प्रलंबित थकबाकी वसुलीसाठी अभय योजना - २०२२ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दिनांक ३० जून २०१७पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकीसाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२२पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

थकबाकी वसुलीसाठी मोठी सवलत

अभय योजनेंतर्गत विविध पर्यायांतर्गत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. सांगली विभागातर्फे जिल्ह्यातील सांगली, पलूस, जत , इस्लामपूर यांसारख्या ठिकाणी एकूण ११ माहिती शिबिरे घेण्यात आली. या योजनेचा फायदा व्यापाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहआयुक्त श्रीमती सुनीता थोरात यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने