ढालगाव येथे स्वराज महाेत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST2021-01-04T04:23:19+5:302021-01-04T04:23:19+5:30

या लकी डॉमध्ये प्रथम क्रमांक पाच एलसीडी, द्वितीय क्रमांक तीन फ्रीज, तृतीय क्रमांक दोन आटा चक्की, ...

Excitement of Swaraj festival at Dhalgaon | ढालगाव येथे स्वराज महाेत्सव उत्साहात

ढालगाव येथे स्वराज महाेत्सव उत्साहात

या लकी डॉमध्ये प्रथम क्रमांक पाच एलसीडी, द्वितीय क्रमांक तीन फ्रीज, तृतीय क्रमांक दोन आटा चक्की, चतुर्थ क्रमांक पंचवीस मिक्सर, पाचवा क्रमांक शंभर डिनर सेट अशी बक्षिसे होती.

स्वराज कलेक्शन हे या परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले व विश्वास संपादन करणारे परिपूर्ण दालन बनले आहे, असे तहसीलदार गोरे यावेळी म्हणाले. ‘एकाच छताखाली सर्व कपडे खरेदी’चा आनंद देणारे पंधरा हजार चाैरस फुटांचे हे दालन आहे. या दालनामध्ये लहान मुले, मुली, थोर मंडळी यांना आवडणारी शूटिंग, शर्टिंग, ड्रेस, साडी, तयार कपडे होलसेल दरात मिळतात. लग्नबस्त्याची खास सोय आहे.

भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. प्रथम क्रमांकाचे एलसीडीचे बक्षीस तानाजी मंडले (ढालगांव), संभाजी सावंत (लंगरपेठ), अनिल जानकर (अंकले), इंदुमती कोळेकर (आरेवाडी) ,बापू कारंडे (ढालगांव) यांना मिळाले. द्वितीय क्रमांकाचे फ्रीजचे बक्षीस आर्यन काबूगडे (नागज), धनराज कुंभार (नागज), सुरेश चव्हाण (ढालेवाडी) यांना मिळाले. ही सोडत मान्यवरांच्या व लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आली. स्वराज कलेक्शनचे मालक अजितराव खराडे यांनी स्वागत केले. या बक्षीस वितरणामुळे ग्राहकवर्गातून मोठे समाधान व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पयोद उद्योगचे देवानंद लोंढे, सिद्धनाथ उद्योग समूहाचे कुमार पाटील, उद्याेजक राजेंद्र पाटील पलूस, स्नेहल लोंढे (राजमुद्रा कमिटी सदस्य) सरपंच मनीषा देसाई, सुनीता खराडे, जनार्दन देसाई, माधवराव देसाई, मधुकर देसाई, दिलीप देसाई, अनिल बाबर, विशाल खोळपे, शिवाजी देसाई, माणिक देसाई, माणिक खराडे, रावसाहेब कोळेकर, भगवान सरगर, श्रीमंत खराडे उपस्थित होते.

फोटो : येणार आहे.

Web Title: Excitement of Swaraj festival at Dhalgaon