शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
2
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
3
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
4
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
5
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
6
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
7
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
8
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
9
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
10
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
11
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
12
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
13
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
14
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
15
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
16
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
17
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
18
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
19
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
20
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival -सांगलीत बाप्पांचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:23 IST

कोरोनाच्या संकटकाळातही भक्तीचा मळा फुलवित भाविकांनी शनिवारी बाप्पा मोरयाच्या गजरात संकटमोचक गणरायाचे जल्लोषी स्वागत केले. सडा, रांगोळ््या, सुंदर आरास, विद्युत रोषणाईचा थाट, सुगंधी द्रव्यांचा घमघमाट, धूप-अगरबत्तीचा दरवळ अशा वातावरणात घरगुती व सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

ठळक मुद्देसांगलीत बाप्पांचे उत्साहात आगमनबाप्पा मोरयाचा गजर : कोरोना संकटकाळातही फुलला भक्तीचा मळा

सांगली : कोरोनाच्या संकटकाळातही भक्तीचा मळा फुलवित भाविकांनी शनिवारी बाप्पा मोरयाच्या गजरात संकटमोचक गणरायाचे जल्लोषी स्वागत केले. सडा, रांगोळ््या, सुंदर आरास, विद्युत रोषणाईचा थाट, सुगंधी द्रव्यांचा घमघमाट, धूप-अगरबत्तीचा दरवळ अशा वातावरणात घरगुती व सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.यंदा गणेशोत्सवावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रुग्णसंख्या वाढत असून या संकटातून जिल्ह्याला पर्यायाने देशाला बाहेर काढण्याचे साकडे घालत भाविकांकडून गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पहाटेपासूनच सांगली शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू होती. मूर्तीकारांनी पहाटे दुकाने उघडली. त्यानंतर सकाळपासून मूर्ती नेण्यासाठी भाविकांनी बाजारात गर्दी केली. फुला-फळांच्या बाजारातही दिवसभर गर्दी होती.दिवसभर सांगलीच्या हरभट रस्ता, मारुती रस्ता, बालाजी चौक परिसरात साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. मारुती रस्ता, गावभाग, बसस्थानक परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक याठिकाणी मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती. कोरोनामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतल्यामुळे शहरात दिवसभर सवाद्य मिरवणुका दिसल्या नाहीत. शांततेत आणि बाप्पा मोरयाच्या गजरात साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवSangliसांगली