शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दुष्काळी तालुक्यातील परीक्षा शुल्क परत मिळणार; सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:37 IST

उपमुख्यमंत्र्यांच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सूचना

विटा : सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम त्यांना तातडीने परत मिळणार आहे. याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची रक्कम लवकरच परत मिळणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी दिली.ॲड. पाटील म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करून त्यांना भरलेली शुल्काची रक्कम परत करावी, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ स्तरावर करून त्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन त्यांनाही दुष्काळी विद्यार्थ्यांची फी माफ करून रक्कम परत करण्याची विनंती केली होती.त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विषय समजून घेतल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून त्यांचे पैसे परत देण्याबाबत सूचना दिल्या. त्यांच्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तासगावचा पूर्व भाग, शिराळ्याचा पश्चिम भाग तसेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काही तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ होईल. त्यांनी यापूर्वी भरलेली परीक्षा शुल्कची रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीexamपरीक्षाStudentविद्यार्थी