शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 12:57 IST

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन..

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारास अर्ज भरण्यासाठी मदत करत आहे, या कारणावरून माजी उपनगराध्यक्ष अय्याज सय्यद मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्यासह स्वीय सहायक खंडू होवाळे व आणखी पाच व्यक्तींवर शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्ह्य दाखल झाला आहे.कवठेमहांकाळ येथील दादा चौकातील मुल्ला यांच्या घरी ही मारहाणीची घटना शुक्रवारी (दि. २७) सकाळी घडली. सदर घटनेची फिर्याद अय्याज मुल्ला यांनी पोलिसांना दिली आहे. अय्याज मुल्ला यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. या वेळी मुल्ला यांचा मुलगा कैफ, पुतण्या एजाज, अनिस आणि आई हाजराबी यांना ढकलून खाली पाडले. तू भविष्यात जिवंत कसा राहतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे मुल्ला यांनी फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसात माजी खासदार संजय पाटील व स्वीय सहायक होवाळ यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिस स्टेशनमध्ये सायंकाळी गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हे पुढील तपास करीत आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन..माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण झाल्यानंतर आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील हे कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पोहोचले. माजी खासदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन थांबवणार नाही, असा पवित्रा घेतला होता.

अय्याज मुल्ला यांच्यावरही गुन्हाकवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या कारणावरून माजी खासदार संजय पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांना गुरुवारी रात्री शहरातील कुची कॉर्नर येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर, शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जीवाला धोका, संरक्षणाची मागणी..माजी खासदार संजय पाटील यांनी फोनवरून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे माजी खासदारांकडून आमच्या व आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे. आम्हाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा