शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिक होणार आता शाळांमध्ये क्रीडा शिक्षक, पदवीधारकांवर बेरोजगारीची टांगती तलवार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:45 IST

शासनाकडून शिक्षण विभागास पत्र देऊन याबाबतचा प्रस्ताव मागविण्यात आला

प्रताप महाडिककडेगाव : माजी सैनिकांना क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत समावून घेण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. पाच शाळांसाठी एक क्रीडा शिक्षकपद निर्माण करण्यात येणार आहे. दि. २३ मार्च रोजी शासनाकडून शिक्षण विभागास पत्र देऊन याबाबतचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे. यामुळे माजी राष्ट्रीय खेळाडू, बीपीएड, एमपीएड व एनआयएस पदवी प्राप्त करून क्रीडा शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मात्र बीपीएड पदवी व एमपीएड पदव्युत्तर पदवी घेतलेले तसेच वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात सहभागी झालेले व प्रशिक्षित क्रीडा मार्गदर्शक असलेले हजारो तरुण सध्या बेरोजगार आहेत.सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य व शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ११ नोव्हेंबर २०२२ रोजी एक सभा घेतली. यात माजी सैनिकांना शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने ८ ते १० शाळांसाठी एक या प्रमाणे क्रीडाशिक्षकाचे पद निर्माण करता येईल का याबाबत अहवाल शिक्षण आयुक्तांना मागितला आहे.हा अहवाल येणे बाकी असताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात पाच शाळांसाठी एक क्रीडा शिक्षक असे प्रमाण ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी द. छ. शिंदे यांनी दि. २३ मार्चला शिक्षण आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून तत्काळ या संदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

पदवीधर देशोधडीला लागतीलया निर्णयामुळे राष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी केलेले व बीपीएड, एमपीएडची पदवी घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पदवीधर बेरोजगार होऊन देशोधडीला लागतील. कित्येक एमपीएड पदवीधारक तासिका तत्त्वावर तुटपुंज्या मोबदल्यात कायम नोकरीच्या आशेने काम करीत आहेत. त्यांचे स्वप्न धुळीस मिळेल. त्यामुळे शासनाने बेरोजगारांचा विचार करून निर्णय बदलावा अन्यथा तीव्र आंदोलन शिबिरात पर्याय असणार नाही. - प्रा. बाळासाहेब माने उपाध्यक्ष, क्रीडा शिक्षक महासंघ

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक