शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आईच्या निधनाचा विरह सहन नाही झाला, सहा तासात माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:18 IST

देशसेवेतून निवृत्त, पण आईच्या विरहाने हारले

दरीबडची : नियतीचा खेळ अत्यंत क्रूर असतो, याचा प्रत्यय वाळेखिंडी (ता जत) येथे आला आहे. आई सत्वशीला रंगराव शिंदे (वय १०७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने तिचा विरह सहन न झाल्याने माजी सैनिक सुभेदार औदुंबर रंगराव शिंदे (वय ५३) यांचेही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आईचे मंगळवारी (दि.१६) दुपारी चार वाजता निधन झाले. त्याची माहिती सुभेदार शिंदे यांना मिळताच ते गावी आले. मात्र, त्यांना आईच्या निधनाचा हृदयविकाराचा धक्का बसल्याने तातडीने सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचे मंगळवारी (दि.१६) रोजी रात्री ११ वाजता निधन झाले. आईच्या निधनानंतर केवळ ६ तासांच्या अंतरात सुभेदार शिंदे यांचे निधन झाले. आई-मुलाच्या एकाचवेळी झालेल्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आपल्या माऊलीच्या जाण्याचे वृत्त समजताच औदुंबर यांना मोठा मानसिक धक्का बसला. आईच्या अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच, सुभेदार औदुंबर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. सुभेदार शिंदे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक भाऊ, सात बहिणी असा परिवार आहे. मयत सत्वशीला रंगराव शिंदे (वय १०७) यांच्यावर मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तर माजी सैनिक मृत सुभेदार औदुंबर रंगराव शिंदे यांच्यावर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता आई शेजारी अंत्यसंस्कार करण्यात आले.देशसेवेतून निवृत्त, पण आईच्या विरहाने हारलेऔदुंबर शिंदे यांनी भारतीय सैन्यात २८ वर्षे सेवा बजावली होती. कठीण परिस्थितीत सीमेवर शत्रूचा सामना करणाऱ्या या जिगरबाज सैनिकाचे मन आपल्या आईसाठी मात्र अत्यंत हळवे झाले होते. भारतीय सैन्यदलात सुभेदार पदावर सेवानिवृत्त झाले. नोकरी आणि सेवा निवृत्तीच्या काळात गावातील त्यांनी अनेक युवकांना सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.गावावर शोककळा पसरलीएकाच कुटुंबातील दोन व्यक्ती, त्यातही देशसेवा केलेला सुपुत्र आणि त्यांची माता एकाच वेळी गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Ex-soldier dies of heart attack within hours of mother's death.

Web Summary : Bereaved by his mother's death at 107, a 53-year-old ex-soldier from Sangli died of a heart attack just six hours later. The village mourns the loss of both mother and son.