शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर कोयनेतून पाणी सोडणार, पण १०५० क्युसेकनेच; सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार 

By अशोक डोंबाळे | Updated: October 27, 2023 12:30 IST

शेतकऱ्यांची गतीने पाणी सोडण्याची मागणी

सांगली : कऱ्हाड ते सांगलीपर्यंत कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवार दि. २७ ऑक्टोबरपासून दुपारी १ वाजेपासून कोयना धरणातून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. पण, पाणी कमी गतीने सोडल्यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यास तीन दिवस लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदी ऑक्टोबर महिन्यातच कोरडी पडली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला होता. प्रशासनाच्या चुकीमुळे कृष्णा काटच्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामाेरे जावे लागले होते. या गंभीर प्रश्नावर आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारीच आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी १ वाजेपासून कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट सुरू केले आहे.या युनिटमधून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे कृष्णा नदी प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. पण, कमी गतीने पाणी सोडल्यामुळे सांगलीत पाणी येण्यास किमान तीन दिवस लागणार आहेत. म्हणून शेतकऱ्यानी कोयना धरणातून किमान दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

विसर्ग वाढविणार : ज्योती देवकरकोयना धरणातून दुपारी १ वाजलेपासून एक हजार ५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन कोयनेतून विसर्ग वाढविण्याची विनंती धरण व्यवस्थापनाकडे केली आहे. त्यानुसार कोयना धरणातून दुपारनंतर आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीKoyana Damकोयना धरण