सांगली : जिल्हा परिषदेत आपली सत्ता आली नाही म्हणून नाराज होऊ नका. राज्यात आपलीच सत्ता आहे. जिल्हा परिषदेत सत्ता नसली, तरी कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. विकासकामांसाठी निधी निश्चितपणे दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सर्वजण एकत्रित राहून काम करा, आम्ही पाठीशी आहोतच, असेही त्यांनी आश्वस्त केले.सांगलीत मंगळवारी महायुतीच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेत बुधवारी सभापती निवडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते माजी खासदार संजय पाटील, शिंदेसेनेचे अमोल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, ब्रह्मानंद पडळकर आदी उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाले, सभापती निवडीबाबत चर्चा व गाठीभेटी सुरू आहेत, त्यामुळे थांबा आणि पहा. सत्ता नसली तरी तुम्हाला योग्य न्याय मिळेल. आमदार व पक्षनेत्यांच्या सूचनांनुसार काम करत रहा. यावेळी त्यांनी सर्व सदस्यांचा परिचय करुन घेतला. प्रत्येकाचे नाव, शिक्षण, मतदारसंघ व कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली.
विनायक मासाळही बैठकीला उपस्थितबैठकीला भाजपचे सर्व १६ सदस्य, शिंदेसेनेचे पाच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) दोन आणि जनसुराज्य व रयत क्रांतीचे एकूण दोन असे २५ सदस्य हजर होते. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी आपण आटपाडीचे शिंदेसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यासोबत असल्याचे जाहीर करणारे सदस्य विनायक मासाळ हेदेखील आजच्या महायुतीच्या बैठकीला उपस्थित असल्याचे दिसून आले.
Web Summary : Guardian Minister Chandrakant Patil pledged funds for Sangli Zilla Parishad development, despite MahaYuti not holding power there. He urged members to work together, assuring support and promising fair treatment irrespective of political control.
Web Summary : पालकमंत्री चंद्रकांत पाटिल ने सांगली जिला परिषद के विकास के लिए निधि का वादा किया, भले ही महायुति सत्ता में नहीं है। उन्होंने सदस्यों से मिलकर काम करने का आग्रह किया और राजनीतिक नियंत्रण के बावजूद निष्पक्ष व्यवहार का आश्वासन दिया।